
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
गोंदे दुमाला गावातून पायी जाणाऱ्या कामगार महिलेला एका अज्ञात भरधाव मोटारसायकलने जोरदार धडक दिली. ह्यावेळी झालेलता अपघातात कामगार महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना आज सायंकाळी सहा वाजेच्या सुमाराला घडली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमी महिलेला घोटी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दिपाली गोटीराम केकरे वय 26 रा. आंबेवाडी हल्ली राहणार गोंदे दुमाला असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.