प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
केंद्र सरकारची चुकीची धोरणे, जीवनावश्यक वस्तुंची महागाई याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी सभापती गोपाळ लहांगे व काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन देण्यात आले.
इगतपुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत द्यावी, चालु वर्षीचे पीक कर्ज माफ करावे, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ कमी करावी, जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी रद्द करावा, अग्निपथ योजना रद्द करावी, शेतीपंपाचे भारनियमन रद्द करावे, स्थानिक भूमिपुत्रांना कंपन्यांमध्ये व शासकीय खात्यामध्ये नोकरीत सामावुन घ्यावे, अधिक पर्जन्यामुळे वाहुन गेलेल्या व गाळ साचलेल्या जमिनी दुरुस्तीसाठी मदत मिळावी, अतिपावसामुळे इगतपुरी तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसह रस्ते काँक्रीटीकरण करण्यात यावे आदींसह विविध मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य कचरू शिंदे, संपत काळे, शेतकरी नेते पांडुरंग शिंदे, रामदास बाबा मालुंजकर, किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुदाम भोर, अरुण गायकर, संपत मुसळे, बाळासाहेब कुकडे, पाडळी देशमुखचे माजी सरपंच जयराम धांडे, सत्तार मणियार, सुरेश धोंगडे, लकी गोवर्धने, आकाश दिवटे, उत्तम शिंदे आदींसह काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.