आगरी सेना युवा तालुकाध्यक्षपदी इंजि. भाऊराव भागडे यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२

आगरी सेनेच्या इगतपुरी तालुका युवा तालुकाध्यक्षपदी इंजि. भाऊराव ज्ञानेश्वर भागडे यांची निवड झाली आहे.आगरी सेनेचे अध्यक्ष राजाराम साळवी व गणपतराव कडु यांच्या हस्ते ठाणे येथील आगरी सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात भागडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. भाऊराव भागडे इगतपुरी तालुक्यातील मानवेढे गावचे उपसरपंच असुन समाजातील तरूण मुलांना एकत्रित करण्याचे काम ते करत आहेत. मानवेढे परिसरात त्यांचा दांडगा संपर्क असल्याने मानवेढे गावातील विकास कामात त्यांचा मोठा हातभार आहे. यावेळी समाजातील अनेक युवक व महिलांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

इगतपुरी तालुक्यात आगरी समाजाची २४ गावे आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आगरी सेना संघटनेचा मतदानात मोठा वाटा असल्याने आगरी सेनेनी अनेक नविन चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसुन येते. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी, राज्य उपाध्यक्ष गणपतराव कडु, राज्य युवा प्रमुख राहुल साळवी, इगतपुरी नगरपरिषदेचे नगरसेवक तथा जिल्हाप्रमुख संपत डावखर, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल लंगडे, आगरी सेनेचे युवा तालुका प्रमुख गणेश कडु, यांच्यासह आगरी सेनेचे नेते सुरेश कडु, रघुनाथ तोकडे, सरपंच अनिल भोपे, लालु दुभाषे, भालचंद्र भागडे, अरूण भागडे, सखाराम जोशी, सरपंच शाम चव्हाण, निलेश जोशी, कैलास कडु, संपतराव म्हसणे, जिल्ह्यातील पदाधिकारी, आगरी समाज बांधव उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!