
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक भोरु कुंदे हे नाशिकच्या पाथर्डी फाटा भागातून जात असतांना त्यांच्या खिशातील पाकीट गहाळ झाले होते. पाकिटात त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, आरसी बुक आणि रोख रक्कम रुपये होती. त्यांनी ह्या रस्त्यावर अनेकदा जाऊन पाकिटाचा पुन्हा पुन्हा शोध घेतला पण ते मिळून आले नाही. त्यामुळे त्यांनी पाकीट शोधण्याचा नाद सोडून दिला. दुसरीकडे केतन पाटील ह्या विश्वासू व प्रामाणिक व्यक्तीला हे पाकीट सापडले. त्यांनी भोरू कुंदे यांना संपर्क साधण्याचा खुप प्रयत्न करूनही संपर्क होवू शकला नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या विविध व्हाट्सॲप ग्रुपवर आधार कार्ड शेयर केले. त्यावर इगतपुरीचा पत्ता असल्यामुळे त्यांनी इगतपुरीच्या एका ग्रुपवर याबाबत माहिती दिली. भोरू कुंदे यांना ओळखणारे संतोष शिरसाठ यांनी त्यांना संपर्क साधुन पाकीट सुरक्षित असल्याची माहिती दिली. केतन पाटील यांनी भोरू कुंदे यांना घरी बोलावून त्यांचे पाकीट परत केले. आताच्या युगात माणुसकी संपत चालली आहे पण नाही केतन पाटील यांच्या सारखे प्रामाणिक माणसं जोपर्यंत आहे, तोपर्यंत माणुसकी अशीच राहील अशी भावना श्री. कुंदे यांनी व्यक्त केली. केतन पाटील यांचा विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आहे. ते नेहमी सामाजिक कार्यात सक्रिय असतात. आजच त्यांनी प्रामाणिकपणा दाखवत त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला वेगळी भेट दिली असे म्हणावे लागेल.