घोटी येथील अंबिका ज्वेलर्समध्ये अज्ञात चोरट्यांकडून चोरी : घोटी पोलिसांकडून तपासाला कसून सुरुवात

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

घोटी शहरातील श्रीरामवाडी भागातील दाट लोकवस्तीच्या भागात अंबिका ज्वेलर्स ह्या दुकानात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पहाटेच्या सुमाराला ही घटना घडली असून चोरट्यांनी सिसिटीव्ही यंत्रणा बंद केल्याचे दिसून आले आहे. यामध्ये किमान 2 लाख 50 हजारांच्या पुढे चोरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घोटी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी उपस्थित होऊन पोलिसांना तपासकार्याचे मार्गदर्शन केले. ह्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. भरवस्तीत झालेल्या चोरीमुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांकडून तपासाची चक्रे सुरु झाली असून लवकरच आरोपी जाळ्यात येईल असे सांगण्यात आले. चोरीबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. श्रीरामवाडी येथे योगेश प्रकाश उदावंत यांचे अंबिका ज्वेलर्स असून आज पहाटे ह्या दुकानात चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणा निकामी केल्याचे समजते. ह्या घटनेत किमान अडीच लाखांचा ऐवज चोरी झाल्याची शक्यता आहे. पोलिसांकडून घटनास्थळी कार्यवाही सुरु झाली असून याबाबत अधिक माहिती लवकरच समजणार आहे. घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी कसून तपास सुरु केला आहे. यामुळे घोटी शहरात खळबळ माजली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!