धामणगाव गटातील असंख्य शिवसैनिकांचे भगवे वादळ शिवाजी पार्ककडे रवाना : शिवसैनिकांचे नियोजन करण्याचे भाग्य मिळाले : खंडेराव झनकर

इगतपुरीनामा न्यूज, दि. 5

धामणगाव खेड गटातील शिवसैनिक अभूतपूर्व संख्येने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी आज रवाना झाले. शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर यांच्या आदेशाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार राजाभाऊ वाजे, तालुकाप्रमुख भगवान आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, गटप्रमुख साहेबराव झनकर, खंडेराव झनकर, कैलास गाढवे, रंगनाथ कचरे, पांडुरंग गाढवे गणप्रमुख शिवाजी काळे, भीमराव साबळे, जेष्ठ नेते बाळासाहेब घोरपडे, उपतालुकाप्रमुख सुदाम भोसले, रामचंद्र परदेशी, शिवाजी गाढवे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले.

धामणगाव गटातील शिवसैनिकांचा उत्साह पाहून आज मन भरून आले. भविष्यात धामणगाव गट भगवामय करणार आहे. शिवसैनिकांचे शिवाजी पार्कवर जाण्याचे नियोजन करण्याचे भाग्य मिळाले असल्याने खूप भाग्यवंत समजतो
- खंडेराव झनकर, शिवसेना नेते खेड गट

मार्गस्थ झालेल्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसला. शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मेळाव्याला जाताना युवासेना उपतालुकाप्रमुख भाऊसाहेब वाजे, तालुका संघटक राधाकिसन झनकर, युवा गटप्रमुख मयूर भोसले, शाखाप्रमुख शरद जाधव, बहिरू केवारे, जनक भोसले, हौशीराम काळे, सोमनाथ वारुंगसे, रामदास वारुंगसे, अशोक वाजे, पंढरी माळी, निवृत्ती आगिवले, उपसरपंच पोपटराव लहामगे, माजी नायब तहसीलदार पांडुरंग कोरडे, भास्कर वाजे, कैलास वाजे, नामदेव घुमरे, नंदू घुमरे, बहिरू गाढवे, विठ्ठल गाढवे, चंद्रभान गाढवे, त्र्यंबक भरतड, चंदर गाढवे, माजी शाखाप्रमुख धोंडीराम गुंजाळ, युवा शाखाप्रमुख राहुल गाढवे, त्र्यंबक गाढवे, जेष्ठ शिवसैनिक दिनकर झनकर, पंडित गायकवाड, भाऊराव झनकर, अशोक रायकर, जयराम झनकर, संजय साबळे, मुरलीधर गातवे, मदन नाना गोरे, बळवंत लहामंगे, किसन बोराडे, पोपट भले, बाजीराव रुपवते, सरपंच साहेबराव बांबळे, गणेश टोचे, अशोक बोराडे, दिलीप पोटकुले यांनी मेळाव्याला जाताना शिवसैनिकांना सूचना व मार्गदर्शन केले. शिवसैनिकांमधील उत्साहामुळे शिवसेनेचे भगवे वादळ पुन्हा वर्चस्व सिद्ध करील अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!