इगतपुरीनामा न्यूज, दि. २
राज्य निवडणूक आयोगाने निधन, राजीनामा, अपात्रता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या रिक्त झालेल्या जागांचा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात 33 जिल्ह्यातील 2 हजार 470 ग्रामपंचायतींच्या 3 हजार 253 जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील 122 ग्रामपंचायतीच्या 182 जागांसाठी ही पोटनिवडणुक होईल.
५ मे रोजी तहसीलदार स्तरावरून पोटनिवडणुकीची नोटीस प्रसिद्ध होईल. 13 ते 23 मे दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. उमेदवारी अर्जाची छाननी 23 मे रोजी सकाळी ११ वाजेला केली जाणार असून अर्ज माघारी घेण्यासाठी 25 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. चिन्हांचे वाटप 25 मे रोजी होणार आहे. उमेदवारांची अंतिम यादी त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाणार आहे. ५ जून रोजी या पोटनिवडणुकीसाठी आवश्यक असल्यास मतदान घेण्यात येणार असून मतमोजणी ६ जूनला करण्यात येणार आहे. राज्यातल्या 33 जिल्ह्यांमधील 2 हजार 470 ग्रामपंचायतींच्या 3 हजार 253 जागांसाठी ही पोटनिवडणूक होणार आहे.