पिंपळद सोसायटीच्या चेअरमनपदी जगन बेझेकर तर व्हॉइस चेअरमनपदी यमुनाबाई दोशिंग बिनविरोध

प्रभाकर आवारी । इगतपुरीनामा न्यूज, दि. २

पिंपळद सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी जगन बेझेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी पोलीस पाटील निवृत्ती बेझेकर यांचे ते चिरंजीव आहेत. व्हॉइस चेअरमनपदी यमुनाबाई दत्तू दोशिंग यांना बिनविरोध मान मिळाला आहे. नाशिक तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील व प्रतिष्ठेच्या असणाऱ्या पिंपळद सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ग्रामस्थांनी एकमताने बिनविरोध केलेली आहे.

जगन बेझेकर, यमुनाबाई दोशिंग, चंद्रभान खांडबहाले, रामु घोलप, सोमनाथ घोलप, गंगुबाई घोलप, बाजीराव खर्डे, शिवराम अनार्थे, राजाराम पावडे, ज्ञानेश्वर जाधव, विलास कड, बाबुराव फडोळ आदींची संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध वर्णी लागलेली आहे. त्यातुन चेअरमनपदी जगन बेझेकर तर व्हॉइस चेअरमनपदी यमुनाबाई दोशिंग यांना स्थान मिळाले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन हिरोजी कनोज यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणुन संस्थेचे सचिव पोपटराव पवार यांनी काम पाहिले. यावेळी पिंपळद अजानवृक्ष आश्रमाचे शिवराम बाबा म्हसकर, माजी चेअरमन रामदास खांडबहाले, केरू घोलप, माजी सरपंच गोकुळ घोलप, मोतीराम बेझेकर, दत्तुभाऊ बेझेकर, नारायण बेझेकर, भाऊसाहेब झोंबाड, सोमनाथ बेझेकर, दिगंबर कड, आशोक खांडबहाले, हरीभाऊ यादव, तानाजी घोलप, जानकु खांडबहाले, आनाजी दोशिंग यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!