इगतपुरीनामा न्यूज, दि.७
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची कौशल्ये आत्मसात करून स्पर्धेच्या युगामध्ये उभे राहण्यासाठी सक्षम बनले पाहिजे. आजचे युग स्पर्धेचे असल्यामुळे सर्वांनीच पारंपरिक शिक्षणाबरोबर कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर दिला पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात परिसर मुलाखत प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते.
याप्रसंगी प्रतीक कळवणकर, गौरव गीत, उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी, प्रा. जी. एस. लायरे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, परिसर मुलाखतीच्या माध्यमातून युवकांनी आपल्या जवळ असलेले कौशल्य छंद व गुणवत्ता उत्तम प्रकारे सादर करुन मिळ्णाऱ्या संधीचे सोने करणे गरजेचे आहे. प्रारंभी स्पर्धा परीक्षा व करियर गायडन्स सेलचे समन्वयक प्रा. जी. एस. लायरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. बी. धोंगडे, आभार प्रा. जी. टी. सानप यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.