सर्वाधिक १३ नगरसेवक निवडून आणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इगतपुरीत अभूतपूर्व कामगिरी 

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत १४ जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने लढवल्या होत्या. यापैकी १३ जागांवर आपले उमेदवार निवडून आणून हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. अवघ्या २६ मतांनी एका जागेवर त्यांच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. पक्षाने अभूतपूर्व कामगिरी केली असून इगतपुरीवरील परिवर्तन पक्षानेच घडवले आहे. इगतपुरीकर नागरिकांनी भरभरून मतांचे दान देऊन आम्हाला सेवेची संधी दिली आहे. आमचा विजय आम्ही इगतपुरीकर जनतेच्या चरणी समर्पित करतो अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष फिरोजभाई पठाण, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी दिली. विजयी उमेदवारांमध्ये फिरोजभाई रमजान पठाण, मंगेश लक्ष्मण शिरोळे, भारती मंगेश शिरोळे, युवराज बाजीराव भोंडवे, अंजुम अस्लम कुरेशी, सागर अनिल आढार, नाझनीन असगर खान, ललिता नामदेव लोहरे, निकत वसीम सय्यद,मयुरी राहुल पुरोहित, आशा सुनील थोरात, सतीश सखाराम मनोहर, आशा प्रशांत भडांगे यांचा समावेश आहे.

error: Content is protected !!