

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबक रस्त्यालगत शेतात काम करत असलेल्या महिलेला भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने चिरडले आहे. ह्या अपघातात महिला जागीच ठार झाली आहे. नयना संदीप जमधडे वय २७ असे दुर्दैवी महिलेचे नाव आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांनी घोटी पोलीस ठाणे आणि घोटी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. यामुळे तणाव आणि एकच गोंधळ उडाला होता. अपघात करणाऱ्या वाहनाच्या वाहन चालकाला घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून याबाबत पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे