
इगतपुरीनामा न्यूज – वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटात माजी पंचायत समिती सदस्य नंदू आंबवणे यांचे सुपुत्र पै. गुरुनाथ आंबवणे यांना उमेदवारी देण्याची मागणी परिसरातील जनतेतुन होत आहे. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागातील वडाचीवाडी कृष्णनगर येथे जन्म झाल्याने गुरुनाथ आंबवणे लायांना जनतेच्या समस्यांची चांगली जाण आहे. सन २००७ ला नांदगाव बुद्रुक पंचायत समिती गणात नंदू तुकाराम आंबवणे हे शिवसेनेकडून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. पंचायत समिती सदस्य पदाचा त्यांना बहुमान लाभलेला आहे. त्यामुळे गुरुनाथ आंबवणे यांचा दांडगा जनसंपर्क आहे. वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात त्यांच्या नातेवाईकांचा गोतावळा आणि मोठा मित्रपरिवार आहे. युवा नेतृत्व गुरुनाथचे शिक्षण डिप्लोमापर्यंत झालेले असून ते सामाजिक बांधीलकी जोपासतात. नंदू आंबवणे यांच्या सूनबाई वैशाली सचिन आंबवणे ह्या गावाच्या सरपंच असून गावात विकासाची कामे करण्याचे त्यांचे ध्येय आहे. कुस्तीत चॅम्पियन असणाऱ्या गुरूनाथने राज्यस्तरावर अनेक पारितोषिक मिळवले असून त्याचा युवा वर्गाशी दांडगा जनसंपर्क आहे. वडिलांकडून राजकीय, सामाजिक क्षेत्राचे बाळकडू घेऊन गुरुनाथने आगामी जिल्हा परिषद लढवावी असा आग्रह धरला जात आहे. वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गट विकासापासून खूप लांब आहे. येथून निवडून येणाऱ्यांनी मतदारांचा विश्वासघात केलेला आहे. खऱ्या अर्थाने विकासाची गंगा आणण्यासाठी मी उमेदवारी करावी असा लोकांचा आग्रह आहे. म्हणून लोकांच्या भावना ध्यानात घेऊन उमेदवारी करेल आणि निवडून येईल असा विश्वास पै. गुरुनाथ आंबवणे यांनी व्यक्त केला.