मला फक्त विकासाचे राजकारण करायला आवडते – रेखाताई रावणगावकर डोंगरे यांचा नागरिकांशी संवाद 

इगतपुरीनामा न्यूज – मला राजकारण करायला बिलकुल आवडत नाही. मला मला फक्त विकासाचे राजकारण करायला आवडते. गोरगरीब जनतेची सेवा करायला आवडते. मला जनतेच्या समस्यांची चांगलीच जाणीव असून त्यांच्या विकासाच्या दृष्टीने उमेदवारी करीत आहे. जनतेने मला संधी द्यावी असे आवाहन देवळाली विधानसभा मतदार संघाच्या उबाठा शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार रेखाताई रावणगावकर डोंगरे यांनी केले. देवळाली मतदारसंघातील हिंगणवेढे येथे विजयादशमीनिमित्त रेणुका माता मित्र मंडळाच्या वतीने रेखाताई यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांना आरतीचा मान देण्यात आला. महिला भगिनींनी त्यांचा सत्कार केला. त्यांनी नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या आणि महिला बचत गटाच्या अडचणी जाणून घेतल्या. निवडणुका येत जात असतात मात्र गोरगरिबांच्या समस्या जैसे थे आहे. राजकारण बाजूला सोडून केवळ समाजहित म्हणून उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. होऊ घातलेल्या देवळाली विधानसभेच्या निवडणुकीत काम करणाऱ्या महिलेला प्राधान्य देऊन संधी द्यावी जेणेकरून विकास साधता येणे सोपे होईल. मतदार संघातील रणरागिणी रेखाताई रावणगावकर डोंगरे  यांना उमेदवारी मिळाल्यास जनतेचे प्रश्न सुटण्यास मदत मिळेल असे यावेळी नागरिकांनी सांगितले. याप्रसंगी रेणुका माता मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, माजी सरपंच राजू धात्रक, निवृत्ती वाघ, जगन्नाथ धात्रक, अशोक धात्रक, संतोष धात्रक, रोहित धात्रक, लक्ष्मण क्षीरसागर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!