इगतपुरीनामा न्यूज – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या इगतपुरी तालुकाप्रमुखपदी दांडगा जनसंपर्क असणारे राजाभाऊ भिवाजी नाठे यांची दुसऱ्यांदा निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जिजाबाई राजाभाऊ नाठे यांच्या माध्यमातुन इगतपुरी पंचायत समिती सभापतीपदावर त्यांनी चांगले काम केलेले आहे. निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे जिल्ह्यात पाहिले जाते. दुसऱ्यांदा या पदावर वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या गोंदे दुमाला गावी येऊन शुभेच्छा दिल्या. गतवेळेस जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तोंडावर राजाभाऊ नाठे यांना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी राजाराम नाठे यांनी इगतपुरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आणली होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर असताना पक्षश्रेष्टींनी त्यांच्यावर तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे. याप्रसंगी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दीप्ती वाजे यांनी राजाभाऊ नाठे यांचा सन्मान केला. यावेळी सिन्नरचे माजी नगराध्यक्ष किरण डगळे, माजी नगरसेवक रुपेश मुठे, ज्ञानेश्वर लगड, डॉ. रमेश सातपुते, पोलीस पाटील खातळे, रामभाऊ धोंगडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख पंडित कातोरे, साहेबराव धोंगडे, गुलाब वाजे, रामभाऊ नाठे, गणप्रमुख बाळासाहेब गोवर्धने, अंबादास धोंगडे, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर यंदे, किसन नाठे, निलेश नाठे, विनोद जाधव, केशव नाठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.