
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
बेलगाव कुऱ्हेकडुन वाडीवऱ्हेच्या दिशेने जाणाऱ्या स्विफ्ट कारचा झाडावर जाऊन आदळल्याने अपघात झाला आहे. MH 03 BE 8228 असा ह्या वाहनाचा क्रमांक आहे. बरशा भागात वळणावर हे वाहन वडाच्या झाडावर जाऊन जोरदार धडकले. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री पावणेबाराच्या दरम्यान घडली. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. यामुळे जखमीचा प्राण वाचायला मदत झाली. स्वप्नील दिलीप भदाणे वय 29, प्रतिक शिराळ वय 32 दोघे राहणार राजीव नगर नाशिक अशी गंभीर जखमींची नावे आहेत.