
इगतपुरीनामा न्यूज – ३५ वा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पोदार इंटरनॅशनल स्कुल व मुंबई नाशिक एक्सप्रेस वे यांच्या संयुक्त विद्यमाने घोटी टोल येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा ह्या विषयावर सुंदर पथनाट्य सादर करून सुरक्षिततेचे संदेश देण्यात आले. सुरक्षा अधिकारी उमेर शेख, वसीम शेख, टोल मॅनेजर योगेश भडांगे, शिवा कातोरे, नितीन चालसे यांच्याकडून उपस्थित शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना रस्ता सुरक्षिततेचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रकल्प अधिकारी मंगेश रूगाले यांनी रस्त्यावरील दिशा दर्शक फलकाबाबत माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी अभियानाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.