
इगतपुरीनामा न्यूज – संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या घोटी बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी पार पडलो आहे. शेतकरी विकास पॅनलला जवळपास बहुमत मिळाले आहे. १८ पैको १६ जागा शेतकरी विकास पॅनलला मिळाल्या आहेत. शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या २ जागा मिळाल्या आहेत. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच ह्या निवडणूकीत प्रचंड प्रतिष्ठा पणाला लावली गेली आहे. ह्या निवडणुकीत लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनल, स्व. रामभाऊ शिरसाठ प्रेरित शेतकरी परिवर्तन पॅनल, कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने प्रणित परिवर्तन पॅनल ह्या तीन पॅनलसह विविध मातब्बर उमेदवारांचा सहभाग होता. निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक कर्मचाऱ्यांकडून कामकाज झाले. . निकालाची संपूर्ण इगतपुरी तालुक्याला उत्सुकता होती. राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष निकालाकडे लागून होते. विजयी उमेदवारांची नावे समजताच फटाके फोडून, घोषणा आणि गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. घोटीचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक उपनिरीक्षक संजय कवडे, इगतपुरीचे उपनिरीक्षक राजाराम दिवटे आदींच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
विजयी उमेदवार – लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनल
नेतृत्व – काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव
1. सोसायटी गट सर्वसाधारण – निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने
2. महिला राखीव – सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे
3. ओबीसी – राजाराम बाबुराव धोंगडे
4. व्हीजेएनटी – ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने व्यापारी गट – भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा हमाल गट – रमेश जाधव. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल – संपत किसन वाजे ग्रामपंचायत सर्वसाधारण – अर्जुन निवृत्ती भोर
विजयी उमेदवार – स्व. रामभाऊ शिरसाठ प्रेरित शेतकरी परिवर्तन पॅनल
नेतृत्व – माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, जनार्दन माळी, रतनकुमार इचम, पांडुरंग बऱ्हे, भास्कर गुंजाळ, ॲड. एन. पी. चव्हाण, संदीप किर्वे, उमेश खातळे
ग्रामपंचायत गट – दिलीप विष्णू चौधरी, ॲड. मारुती रामभाऊ आघाण

