शेतकऱ्यांचे कल्याण आणि विकासाच्या नवीन पर्वासाठी शेतकरी विकास पॅनलच्या हाती सत्ता द्या : छावा मराठा सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते सुनीलभाऊ भोर यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कल्याण आणि विकासाचे नवीन पर्व स्थापन होणार आहे. घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार आहेत. हा ऐतिहासिक विजयी बळकट करण्यासाठी छावा मराठा सेना शेतकरी विकास पॅनलच्या पाठीशी आहे. उद्या कपबशी ह्या निशाणीवर मतदानाचा ठसा देऊन संपूर्ण पॅनलला विजयी करावे असे आवाहन छावा मराठा सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते सुनीलभाऊ भोर यांनी केले आहे. संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्व समर्थकांना शेतकरी विकास पॅनलच्या विजयासाठी सक्रिय करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर विठ्ठल धोंगडे, प्रदेश सचिव प्रकाश भोर, प्रदेश संघटक भोरूभाऊ दराणे आदी पदाधिकारी हजर होते.

लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलतर्फे सोसायटी गटातून निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने. महिला राखीव – सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे. ओबीसी – राजाराम बाबुराव धोंगडे. व्हीजेएनटी – ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने. ग्रामपंचायत गट सर्वसाधारण – अर्जुन निवृत्ती भोर, नंदलाल भाऊ भागडे. एससीएसटी – संतू नारायण साबळे. आर्थिक दुर्बल – संपत किसन वाजे. व्यापारी गट भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा. हमाल तोलारी गट रमेश खंडू जाधव ह्या १८ उमेदवारांच्या कपबशी या चिन्हावर ठसा मारून शेतकरी विकास पॅनलला विजयी करा असे आवाहन छावा मराठा सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते सुनीलभाऊ भोर यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!