इगतपुरीनामा न्यूज – नांदगाब बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदाची, व्हॉइस चेअरमनपदाची निवडणूक मविप्रचे माजी संचालक वसंतराव मुसळे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी नानाभाऊ त्र्यंबक गायकर तर व्हॉइस चेअरमनपदी कृष्णनगरचे मनोहर चंदर जाधव यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शशांक पगारे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा सोसायटीचे सचिव प्रमोद कहांडोळ यांनी कामकाज पाहिले. मागच्या महिन्यात संचालक पदाची बिनविरोध निवड झाली होती. बन्सी पागेरे, दादाभाऊ शिरसाठ, रामदास गायकर, निवृत्ती करवर, भाऊसाहेब गायकर,नारायण गायकर, ज्ञानेश्वर पागेरे, रखमाबाई मेंगाळ, कमळाबाई पाळदे, कौसाबाई मुसळे, विठोबा संधान, सरपंच अनिता देवा मोरे, उपसरपंच मनीषा दिनकर गायकर, माजी उपसरपंच राजाराम गायकर, मोहन झोमान, बन्सी जाधव, बाजीराव गायकर, उल्हास संधान, समाधान पागेरे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रोहिदास गायकर, विकास मुसळे, पै. संदीप गायकर, रंगनाथ खातळे, विष्णू पागेरे, हिरामण गायकर, किसन चौधरी, परशराम गायकर, समाधान गायकर, मंगेश पगारे, माणिकराव शिरसाठ, अरुण शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते देवा मोरे आदींनी निवडीचे स्वागत केले. शेतकऱ्याचे नैसर्गिक आपत्तीच्या संकटाने कंबरडे मोडले आहे. याकरिता विविध कार्यकारी संस्थेच्या मार्फत जिल्हा बँकेकडे तगादा लावून शेतकऱ्यांना कमी व्याजदरात जास्तीत जास्त कृषी कर्ज व मध्य मुदतीत कर्ज पुरवठा उपलब्ध करून कसा देण्यात येईल यावर आमचा भर असल्याचे नवनियुक्त चेअरमन नानाभाऊ गायकर यांनी सांगितले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group