
इगतपुरीनामा न्यूज – अनेक बँका मोडकळीस आल्या असताना घोटी मर्चंट बँकेचा कारभार उत्तम चालला असून बँकेचे नाव जिल्हाभरात आहे. त्यामुळे घोटी मर्चंट बँक आदर्श आहे. या बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे वाटते. निवडणुकीसाठी लागणारा खर्च वाचवून सभासदांच्या हितासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन खादी ग्रामोद्योगचे व्हॉइस चेअरमन अनिल भोपे यांनी केले आहे. घोटी मर्चंट बँकेची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाल्यास बँक आणि सभासदांचे हित जोपासले जाईल. म्हणून ह्या निवडणुकीतील नेत्यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन गत निवडणुकीतील उमेदवार तथा सभासद अनिल भोपे यांनी म्हटले आहे. सामंजस्य राखून पैशाचा अनाठायी खर्च याचा सदुपयोग सत्कार्णी व्हावा असे ते म्हणाले. त्यांना निवडणूक लढवाल का ? असा प्रश्न विचारले असता ते म्हणाले की जुन्या जाणकारांनी नवीन काही होतकरू तरुणांना संधी द्यावी. काही अनुभवी लोकांनी संचालक मंडळात राहून बँकेच्या उन्नती प्रगतीसाठी बिनविरोध निवडणूक पार पाडावी ह्यातच बँकेचे हित ठरेल असे ते म्हणाले.