इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
इगतपुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेष्ठ नागरिक संघ कार्याध्यक्षपदी तालुक्यातील काननवाडी येथील जेष्ठ नेते निवृत्ती करवर यांची निवड करण्यात झाली आहे. निवडीचे पत्र तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे यांनी दिले. पक्ष संघटन वाढवण्यासाठी निवृत्ती करवर यांचे कार्य चांगले असून त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल माजी आमदार शिवराम झोले, अशोक काळे, प्रवीण वाजे, सागर गव्हाणे, मेहुल शहा आदींनी अभिनंदन केले.