
इगतपुरीनामा न्यूज – पंचायती राज राष्ट्रीय दिनानिमित्त आज सोमवार दि. २४ एप्रिल रोजी इगतपुरीच्या उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने इगतपुरी तालुुुक्यातील टिटोली ग्रामपंचायत कार्यालयात सनद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात येथील पात्र नागरिकांना सनद वाटप करण्यात आली. या कार्यक्रमास टिटोलीच्या सरपंच काजल गभाले, उपसरपंच तथा खादी ग्रामोद्योग संघाचे व्हॉइस चेअरमन अनिल भोपे, भुमि अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक विष्णू भाबड, मुख्यालय सहाय्यक मिलिंद जगताप, परीरक्षण भूमापक नंदलाल नेरे, ग्रामसेविका श्रीमती गोसावी, पंकज मानधने यांच्यासह टिटोली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.