
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – इगतपुरी तालुक्यातील मोगरे विविध कार्यकारी संस्थेच्या निवडणूकीत इगतपुरीचे माजी आमदार तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवराम झोले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, श्रावण जाखेरे, पांडुमामा जाखेरे यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद यश मिळवले आहे. ह्या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने १० जागांवर विजय मिळवला. निवडून आलेल्या संचालकांत देविदास जाधव, यशवंत उगले, रुपाबाई गवारी, शकुंतला गवारी, भाऊसाहेब जाखेरे, बाळू जाखेरे, नंदू भोईर, हेमंत झोले, वामन वारघडे यांचा समावेश आहे. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, माजी सभापती सोमनाथ जोशी, सरपंच साहेबराव जाधव, माजी सरपंच रामदास जाधव, त्र्यंबक शिंदे, सुदाम जाधव, प्रमोद उगले, बळवंत जाधव, बाळासाहेब झोले, गेणू जाखेरे, सुरेश कुंदे, विलास गवारी, नामदेव दराणे, कृष्णा घारे, श्रावण मेमाने आदींनी नूतन संचालकांचे अभिनंदन
