लायफेररिअन असोसिएशन मुंबई यांच्याकडून धामडकीवाडी येथे ग्रंथालय बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ – इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी धामडकीवाडी येथे लायफेररिअन असोसिएशन मुंबई यांच्याकडून ग्रंथालय हॉलच्या बांधकामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. वाडीतील ग्रामस्थांसाठी सांस्कृतिक सभागृह व तरुणांसाठी ग्रंथालय असावे यासाठी धामडकीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी हे अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. प्रमोद परदेशी यांच्या प्रयत्नातून लायफेररिअन असोसिएशन मुंबई यांच्यातर्फे धामडकीवाडी ग्रामस्थांसाठी सांस्कृतिक सभागृह व ग्रंथालय हॉल मंजूर करण्यात आला. लायफेररिअन असोसिएशनकडून लोकांमध्ये वाचन संस्कृती वाढण्यासाठी गावागावात ग्रंथालयाद्वारे वाचन संस्कृती जपत आहेत. त्यासाठी आवश्यक पुस्तकांची मदत त्यांच्याकडून करण्यात येत असते. भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी लायफेररिअन असोसिएशन मुंबईचे हिरू भोजवानी, कुंतल भंडारे, ग्रामपंचायत सदस्य गोकुळ आगिवले, चांगुणा आगिवले, खेमचंद आगिवले, बबन आगिवले, लहानू आगिवले, शिक्षक दत्तू निसरड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स

इगतपुरी व घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा
आमच्याशी संपर्क साधा
94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!