माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समजून घेतल्या व्यथा : इगतपुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचे शिवसेनेने दिले निवेदन

इगतपुरीनामा न्यूज, दि. 27

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव, खेड भैरव परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे भातपिकांसह प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख तथा माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी धामणगाव गटात पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान डोळ्यात पाणी आणणारे असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी, इगतपुरी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांबाबत शासनदरबारी आवाज उठवावा असे निवेदन माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना देण्यात आले. शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख भगवान आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, खंडेराव झनकर, गटप्रमुख साहेबराव झनकर, कैलास गाढवे, मोहन बऱ्हे, सुदाम भोसले यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील धामणगाव, खेड येथे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी या भागातून मागणी आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या. ह्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचा त्यांनी शब्द दिल्याबद्धल त्यांचे आभार मानतो.
- खंडेराव शिवराम झनकर, शिवसेना खेड धामणगाव गट

शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेण्यासाठी आलेले आदित्य ठाकरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर यांचे यावेळी शिवसेनेच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सभापती रंगनाथ कचरे, गणप्रमुख शिवाजी काळे, भीमराव साबळे, राजाभाऊ घोरपडे, शाखाप्रमुख शरद जाधव, युवासेना शाखाप्रमुख राहुल गाढवे, माजी शाखाप्रमुख धोंडीराम गुंजाळ, सरपंच ज्ञानेश्वर मोंढे, बबन बोराडे, त्र्यंबक गाढवे, सोमनाथ वारुंगसे, माजी सरपंच त्र्यंबक भरतड, बहिरू केवारे, अशोक गाढवे, नामदेव घुमरे, चंदर गाढवे, खंडू घुमरे, चेअरमन नंदू गाढवे, ज्येष्ठ शिवसैनिक कोंडुळे, भिका पानसरे, तुकाराम गाढवे, साहेबराव बांबळे, रामदास वारुंगसे, विश्वनाथ गाढवे, सुदाम भोसले, धनाजी भोसले, संजय भालेराव, भगवान भोसले, एकनाथ भरतळ, शिवसेना संघटक राधाकिसन झनकर, दिलीप पोटकुले, हेमंत झनकर, उपसरपंच पप्पू लहामगे, अनिल झनकर, गणपत धोंगडे, लालमन भांडकुळी, अमर झनकर, अण्णा झनकर, राम झनकर, कार्तिक झनकर, आजाद पवार, योगेश झनकर, साईनाथ जुंद्रे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!