दलपतपुर येथे होणार सांस्कृतिक भवन : रवींद्र भोये यांच्या प्रयत्नांना यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलपतपुर येथे आदिवासी योजनेतून  मंजूर झालेल्या ३० लाख किमितीचे सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे यासाठी माजी उपसभापती पंचायत समिती सदस्य  रवींद्र भोये यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आदिवासी समाजातील लोककला, सामुदायिक विवाह, परंपरागत सण उत्सव आणि त्यांच्यातील उपजत कलागुण व सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देण्यासाठी आदिवासी भागात जागा उपलब्ध नसते. त्यामुळे कौशल्य विकास आणि सांस्कृतिक बुजरेपणा घालविण्यासाठी आदिवासी भागामध्ये सांस्कृतिक भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दलपतपुर येथे भव्य आदिवासी सांस्कृतिक भवन साकारण्यात येणार असल्याने आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांस्कृतिक भवनाच्या कामाचे आज भूमिपूजन करून कामास प्रारंभ करण्यात आला. यावेळी  माजी उपसभापती पंचायत समिती सदस्य रवींद्र भोये, मुख्तार सय्यद, योगेश देवरगावकर, गोकुळ बत्तासे, चिन्मय साखरे, श्याम सय्यद, चेतन साखरे, भरत खोटरे, महेश लांघे, उपसरपंच अशोक खोटरे, प्रकाश बोरसे, सोमनाथ भोये, चेतन भोये, सुरेश भोये, अशोक भोये, संदीप भोये आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!