इगतपुरीनामा न्यूज – नासिककडून मुंबईच्या दिशेने चाललेला ट्रक आज पहाटे अचानक पेटला. ट्रकचा क्रमांक MH 27 BX 7674 असून ह्या ट्रकला नव्या कसारा घाटात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. मुंबई नासिक एक्सप्रेसवे अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. ह्या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. आगीच्या घटनेची माहिती समजताच मुंबई नासिक एक्सप्रेसवे गस्त पथक अधिकारी रवी देहाडे आपल्या टीम सोबत घटनास्थळी पोहचले. अग्निशमन दलाचे फायरमन राजाराम गायकवाड, समाधान चौधरी, भटाटे यांच्या मदतीने आग शमवण्यात आली. यावेळी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक पवार, दिंडे, सानप यांनी विशेष परिश्रम घेतले.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group