इगतपुरीनामाची बातमी पुन्हा एकदा खरी ठरली
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७
“इगतपुरीनामा”ने इगतपुरी नगरपालिकेचे नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता बातमीद्वारे व्यक्त केली होती. ती आज खरी ठरली. इगतपुरी येथील शिवसेना नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केला आहे. लवकरच आणखी 6 नगरसेवक शिंदे गटाचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यानंतर इगतपुरी तालुक्यातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात जात असल्याचे आज सिद्ध झाले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उद्या आरक्षण सोडत असून उद्यानंतर पक्षांतर वाढणार असल्याची सुद्धा चर्चा आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून शिंदे गटामध्ये नगरसेवक, माजी नगरसेवक, दाखल होत आहेत. परंतु नाशिक जिल्ह्यातून एकही नगरसेवक शिंदे गटात सामील होताना दिसत नव्हता. अशा वेळी इगतपुरी नगरपरिषदेचे शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक उमेश कस्तुरे हे शिवबंधन सोडून एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांनी एकनाथ शिंंदे यांंची मुंबई येथील नंदनवन या निवासस्थानी भेट घेऊन आज प्रवेश केला.
संबंधित बातमी वाचा https://bit.ly/3OEd4HB