शिवसेना नेते संजय राऊत यांना पाठींबा देण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातून शेकडो शिवसैनिक मुंबईकडे रवाना

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची मुंबईत पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये त्यांच्याकडून मोठे खुलासे केले जाणार आहेत. त्यांनी भाजपला काय उखडायचे ते उखडा असा इशारा दिला आहे. त्यानुसार भाजपचे साडेतीन लोक नेमके कोण हे स्पष्ट होणार आहे. म्हणून खासदार संजय राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी उत्त्तर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतून शेकडो शिवसैनिक मुंबई येथील शिवसेना भवन येथे जाण्यासाठी निघाले आहेत. घोटी टोल नाका परिसरातून शेकडो वाहने आणि शिवसेनेचे नेते मुंबई शिवसेना भवनाकडे निघाले आहेत. यामुळे महामार्गावर वाहने वाढली असून टोलनाक्यावर सुद्धा गर्दी वाढली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!