घोटी खुर्दच्या तत्कालीन सरपंच ताई बिन्नोर यांना अनर्ह ठरवल्याचा आदेश अप्पर आयुक्तांकडून कायम ; अपील फेटाळले : कुटुंबातील लोकांच्या नावाने काढलेले धनादेश भोवले

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी अपात्र घोषित केल्याचा आदेश नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी कायम केला आहे. अनर्ह झालेल्या सरपंच ताई बिन्नोर यांचे अपील फेटाळण्यात येऊन मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश कायम करण्यात आला आहे याप्रकरणी शिवाजी एकनाथ फोकणे […]

समता पॅनलच्या २१ उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन : दैदीप्यमान कार्यामुळे समता पॅनलचा विजय निश्चित

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नाशिक या सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक २ जुलैला होत आहे. बॅंकेचे कार्यक्षेत्र संपुर्ण जिल्हाभर असून मतदार संख्या १३ हजार २४० आहे. ही निवडणुक समता पॅनलतर्फे लढवली जात आहे. समता पॅनलमध्ये सुधीर निंबा पगार, गणेश भिमा वाघ, विजयकुमार भाऊसाहेब हळदे, अमित शामराव आडके, दिपक […]

घोटी बाजार समिती सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवून शेतकरी विकास पॅनलने आपले वर्चस्व स्थापित केले. त्यानंतर आज सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली. सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांनी कामकाज पाहिले. बाजार समितीचे […]

घोटी बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी आज निवड प्रक्रिया : दोन्ही पदांवर बिनविरोध निवडीची शक्यता

इगतपुरीनामा न्यूज – मागील महिन्यात प्रचंड चूरशीच्या झालेल्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे १६ संचालक निवडून आले होते. शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या २ जागा काबीज करता आल्या होत्या. खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना ( ठाकरे ) उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन […]

घोटी मर्चंट बँकेवर प्रगती पॅनलची एकतर्फी सत्ता : संपूर्ण १७ जागांवर केला विजय संपादन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोठी अर्थवाहिनी असणाऱ्या घोटी मर्चंटस को ऑप बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. सर्वच्या सर्व १७ जागा जिंकून बँकेवर सत्ता स्थापन करण्यात आली आहे. आज झालेल्या मतमोजणीमध्ये सोमनाथ अंबादास काळे,  ईश्वरलाल मांगीलाल चोरडिया, दिपककुमार पन्नालाल चोरडिया, प्रशांत नंदलाल पिचा, विशाल विजयकुमार पिचा, चांदमल सोहनराज भन्साळी, ज्ञानेश्वर बजरंग भोर, […]

पांडुरंग खातळे यांच्या नेतृत्वाखाली कऱ्होळेच्या थेट सरपंचपदी श्रावण आघाण यांच्यासह ३ ग्रामपंचायत सदस्य विजयी : इगतपुरीत झालेल्या मतमोजणीचा निकाल घोषित

इगतपुरीनामा न्यूज – सार्वत्रिक निवडणुक झाल्यानंतर थेट सरपंचासह ४ ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिल्याने चर्चेत आलेल्या कऱ्होळे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज इगतपुरीत पार पडली. ह्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते माजी सरपंच पांडुरंग रामचंद्र खातळे यांच्या नेतृत्वाखालील उमेदवार विजयी झाले आहेत. थेट सरपंचपदी श्रावण पांडुरंग आघाण यांनी विजय मिळवला. ग्रामपंचायत सदस्य म्हणून पंढरीनाथ रामचंद्र आघाण, आशाबाई पंढरीनाथ आघाण […]

नांदूरवैद्य सोसायटीच्या चेअरमनपदी सुखदेव काजळे, व्हॉइस चेअरमनपदी ज्ञानेश्वर कर्पे बिनविरोध

इगतपुरीनामा न्यूज – नांदूरवैद्य विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदाची आणि व्हॉइस चेअरमनपदाची निवडणूक जेष्ठ नागरिक पंढरीनाथ लक्ष्मण मुसळे, सुखदेव गोविंद दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी सुखदेव बापू काजळे तर व्हॉइस चेअरमनपदी ज्ञानेश्वर खंडू कर्पे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शशांक पगारे, बाळासाहेब काळे, सचिव प्रमोद कहांडोळ यांनी निवडीचे कामकाज पाहिले. निवडीच्या बैठकीवेळी […]

शेतकरी विकास पॅनलच्या विजयी संचालकांचा पाडळी देशमुख सोसायटी आणि ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

इगतपुरीनामा न्यूज – घोटी बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवार विजयी झाले. यानिमित्ताने पाडळी देशमुख विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामपंचायतीतर्फ नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके आदींनी मनोगत व्यक्त केले. निवृत्ती जाधव, ज्ञानेश्वर […]

शेतकरी विकास पॅनलला १६ जागा ; शेतकरी परिवर्तन पॅनलला २ जागा

इगतपुरीनामा न्यूज – संपूर्ण इगतपुरी तालुक्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या घोटी बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी पार पडलो आहे. शेतकरी विकास पॅनलला जवळपास बहुमत मिळाले आहे. १८ पैको १६ जागा शेतकरी विकास पॅनलला मिळाल्या आहेत. शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या २ जागा मिळाल्या आहेत. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच ह्या निवडणूकीत प्रचंड प्रतिष्ठा पणाला लावली गेली आहे. ह्या निवडणुकीत […]

शेतकऱ्यांचे कल्याण आणि विकासाच्या नवीन पर्वासाठी शेतकरी विकास पॅनलच्या हाती सत्ता द्या : छावा मराठा सेनेचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते सुनीलभाऊ भोर यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कल्याण आणि विकासाचे नवीन पर्व स्थापन होणार आहे. घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी विकास पॅनलचे सर्वच उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार आहेत. हा ऐतिहासिक विजयी बळकट करण्यासाठी छावा मराठा सेना शेतकरी विकास पॅनलच्या पाठीशी आहे. उद्या कपबशी ह्या निशाणीवर मतदानाचा ठसा देऊन संपूर्ण पॅनलला विजयी करावे […]

error: Content is protected !!