निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध भागात गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन विसर्जन करण्यात आले. सकाळपासून विविध मंडळांनी नियोजित वेळेत जवळ असणाऱ्या नदी, धरणे ह्या ठिकाणी बाप्पाला विसर्जित केले. तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे गेल्या दहा दिवसापासून विराजमान झालेल्या बाप्पाला आज साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. विसर्जन शांततेत झाले असून कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही. […]
इगतपुरीनामा न्यूज – ‘श्री स्वामी समर्थ क्रिएशन’ प्रस्तुत ‘मोरया’ या नव्या कोऱ्या भक्तिगीताने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. एका गणेशभक्ताने आर्त भावनेने गणरायाला वंदन करत घातलेली साद या ‘मोरया’ गाण्यातून स्पष्ट कळतेय. गणरायाचं आगमन झाल्यावर त्यांचा आनंद त्या गणेशभक्तांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय. यंदाच्या गणेशचतुर्थीला ‘मोरया’ हे मराठमोळं भक्तीगीत प्रत्येक गणेशप्रेमींच्या हृदयाचा ठोका चुकवायला सज्ज […]
इगतपुरीनामा न्यूज – कावनई येथील कपिलधारा येथील प्रसिध्द तीर्थक्षेत्री शिवमंदिर व राममंदिरात ऋषी पंचमी निमित्त स्नाना आणि शिव पुजनासाठी भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळत आहे. अधिक मासानंतर आता ऋषी पंचमी निमित्त हजारो भक्त महिला भाविकांनी स्नानाचा व शिव दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती विश्वस्त कुलदीप चौधरी यांनी दिली. यावेळी मंदिराचे महंत रामनारायण दास फलाहारी महाराज व […]
इगतपुरीनामा न्यूज – परमपूज्य आनंदमूर्ति गुरुमाँ भक्तपरिवार आयोजित नाशिक येथे १७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता शंकराचार्य संकुल, जुना गंगापूर नाका येथे योगनिद्रा सत्र होणार आहे. मानसिक तणाव हा सगळ्यांनाच असून अनेक लोक तणावात जीवन जगत आहेत. याचे दुष्परिणाम भयंकर आहेत. मनुष्य बऱ्याच वेळा तो तणावात नाही असे समजत असला तरी तो तणावात असतो. त्याचे दुष्परिणाम […]
इगतपुरीनामा न्यूज – टिळकांनी गणेशोत्सव सण समाज जागृतीसाठी असून ही परंपरा मंडळांनी सुरू ठेवावी. नियमांचे तंतोतंत पालन करून उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. कायद्याचे उल्लंघन होणार नाही याचे भान ठेवून सामाजिक जबाबदारीने काम करावे असे आवाहन वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी केले. आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता […]
इगतपुरीनामा न्यूज – श्री दत्तसेवा समितीच्या वतीने प. पु. वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात २ ते ४ सप्टेंबर पर्यंत ही व्याख्यानमाला होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. व्याख्यानमाला मागील नऊ वर्षांपासून आयोजित केली जात असून यंदा आयोजनाचे दहावे वर्ष आहे. २ ते ४ सप्टेंबर […]
इगतपुरीनामा न्यूज – अनघा टूर्स आयोजित श्री दत्त परिक्रमा यात्रा १९ ते २५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रमुख स्थळांना श्री दत्ता परिक्रमा यात्रेद्वारे दर्शन घेण्याचे भाग्य भाविकांना मिळणार आहे. पिठापुर, कुरवपूर, मंथनगड, कडगंची, गाणगापुर, अक्कलकोट, तुळजापूर, कुमशी इत्यादी दत्त ठिकाणे समाविष्ट असून […]
संदीप कोतकर : इगतपुरीनामा न्यूज – प्रत्येकाने आपल्या जीवनाचे ध्येय ठरवणे फार गरजेचे आहे. जीवनात स्पष्टता असणे महत्त्वाचे असून देशभक्ती वृद्धिंगत होऊन देशभक्त तयार झाले पाहिजे. लोकप्रतिनिधी लोकांसाठी उपलब्ध नसेल तर त्याला संविधानिक पद्धतीने हाणून पाडले पाहिजे. आपण सर्वांनी लोकशाहीचे शिल्पकार व्हा असे आव्हान ‘जागृत नाशिक जागृत भारत ‘अभियानाचे प्रवर्तक स्वामी श्री कंठानंद यांनी केले. […]
इगतपुरीनामा न्यूज – दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रावण मास निमित्ताने आणि २७, २८ ऑगस्टला नियोजित असलेल्या समस्या मार्गदर्शन कार्यक्रमा निमित्ताने स्व स्वरूप संप्रदाय इगतपुरी तालुक्यातर्फे इगतपुरी ते श्री क्षेत्र कावनई पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ८०० ते ९९० भाविक महिला आणि पुरुषांनी ह्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आनंद घेतला. डोक्यावर मंगल कलश आणि […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी येथील जोग महाराज भजनी मठात मठाधिपती हभप गुरुवर्य तपोनिधी माधवबाबा घुले यांच्या आशीर्वादाने अधिकमास तथा पुरुषोत्तम मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन महोत्सवात प्रारंभ झाला. यात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्रीमद्भभागवत कथा प्रवक्ते हभप जगदीश महाराज जोशी यांची दररोज दुपारी २ ते ५ या दरम्यान कथासेवा होणार आहे. पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरीपारायण, श्रीमद्भागवत […]