उद्या गोंदे दुमाला येथील ग्रामदेवता भवानी माता यात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील जागृत देवस्थान असलेले ग्रामदेवता भवानी माता जंगी यात्रोत्सवानिमित्त उद्या मंगळवारी २३ तारखेला  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविक व दुकानदारांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत गोंदे दुमाला आणि समस्त ग्रामस्थांनी केले आहे.  सकाळी ७ वाजता नवीन झेंडापूजन, ९ ते ११ मारुती मंदिरात होमहवन, ११ वाजता सामुदायिक हनुमान चालीसा पठण, दुपारी ३ ते ४ गावातील ग्रामस्थ व पाहुण्यांना फेटे बांधणे, ४ वाजता रथ पूजन, दुपारी साडे चार वाजता मारुती मंदिरापासून भवानी माता मंदिरापर्यंत शोभायात्रा होणार आहे. कळवणकरांचा बोहड्याचा  कार्यक्रम, दिंडोरीकरांचे अश्व नृत्य, सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी भवानी मातेची आरती व ओटीभरण, त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम, रात्री साडे नऊ ते एक दीपाली पुणेकर सह बाळासाहेब बेलेकर यांचा तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

Similar Posts

error: Content is protected !!