शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी संघर्ष समितीचे विविध प्रश्नांसाठी उपसंचालकांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज दि. २९ : पुणे विभागातील पुणे, सोलापूर, अहमदनगर ,सातारा, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यातील शालार्थ, मान्यता व इतर प्रश्नासंदर्भात उपसंचालक उकिरडे यांची भेट घेऊन विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले. विभागातील ११८० प्रकरणे उपलब्ध असून ११५६ प्रकरणे बोर्डाकडे असून १२१ प्रकरणांना त्रुटी आहेत. ३४७ प्रस्ताव अदयापही उपसंचालक कार्यालयात जमा झाले नसून त्याबाबत […]

शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार मोरे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

विजय पगारे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ सेवानिवृत्तीनंतर सामाजिक उत्तरदायित्व जोपासून समाजहितासाठी प्राधान्य देऊन सार्वजनिक कार्यात योगदान द्यावे, समाजाच्या विकासाला कसा हातभार लावता येईल याला कायम प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला बीटाचे शिक्षण विस्ताराधिकारी नंदकुमार मोरे यांच्या सेवापूर्ती निमित्त झालेल्या गौरव सभारंभात मार्गदर्शन करतांना प्रमुख […]

टोल प्रशासनाकडून घाटनदेवी मंदिर परिसरातील रस्त्यांची डागडुजी

इगतपुरीनामा न्यूज दि. ०६ : इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या घाटनदेवी मंदीर येथे उद्या पासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे. उद्या सुरू होत असलेल्या नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मंदिर परिसरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. खराब रस्त्यांमुळे भक्ताची होणारी गैरसोय पाहता घाटनदेवी ट्रस्टने रस्त्याच्या डागडुजीे साठी MNEL प्रशासनाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देवून MNEL घोटी […]

अहो आश्चर्यम! व्हॉट्सॲप आणि फेसबुक चक्क बंद पडलं!

इगतपुरीनामा न्यूज दि. ५ : सोशल मीडिया मध्ये सगळ्यात जास्त वापरले जाणारे व्हॉट्सॲप हे मेसेंजर ॲप आणि फेसबुक ह्या दोन्हींची सेवा काल रात्री नऊ नंतर अचानक बंद झाली. तांत्रिक बिघाडामुळे सर्व्हर डाऊन झाल्याचे स्पष्टीकरण दोन्ही कंपन्यांकडून देण्यात आले आहे. We’re aware that some people are experiencing issues with WhatsApp at the moment. We’re working to […]

चिंचलेखैरे शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

इगतपुरीनामा न्यूज दि. १८ : इगतपुरी तालुक्याच्या अतिदुर्गम भागात वसलेल्या चिंचलेखैरे या आदिवासीबहुल गावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेची स्थापना १९५६ च्या स्वातंत्र्यदिनी झाली असल्याने सतंत्र्यादिनाच्या सोबतच शाळेचा वर्धापन दिनही उत्साहात साजरा करण्यात आला. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मंगेश मिल्खे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजाचे ध्वजारोहण सरपंच […]

शहरवासीयांचा संताप : इगतपुरी शहर रात्रभर अंधारात

इगतपुरीनामा न्यूज दि. ११ : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे इगतपुरी शहराचा काही भाग रात्रभर अंधारात असून आठ तास उलटूनही विद्युतपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. इगतपुरी शहर आणि परिसरात विजेचे अघोषित भारनियमन नित्याचेच झाले असून अनेकदा सांगूनही यावर काहीही उपाययोजना केली जात नसल्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी […]

बिग ब्रेकिंग : नाशिक जिल्हा परिषदेतील उच्चपदस्थ महिला अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

इगतपुरीनामा न्यूज दि. १० : नाशिक जिल्हा परिषदेतील एक बड्या महिला अधिकाऱ्याला मोठ्या रकमेची लाच घेतांना पकडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याची माहिती मिळाली असून सदर घटनेला दुजोरा मिळत आहे..

शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करण्याची आमदार कपिल पाटील यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज दि. १० : कोविड संसर्ग पूर्णपणे गेला नसल्याने सध्याच्या वातावरणात परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे, याच पार्श्वभूमीवर माननीय उच्च न्यायालयाने अकरावीची सीईटी परीक्षा रद्द केली आहे. तोच संदर्भ घेवून आमदार कपिल पाटील यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रद्द करावी अशी मागणी […]

लांबणीवर पडलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला बारा ऑगस्टचा मुहूर्त

इगतपुरीनामा न्यूज (वाडीवऱ्हे) दि. ०९ : सन २०२०-२०२१ ची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे रद्द झाली होती, ती परीक्षा आता गुरुवार दि. १२ ऑगस्ट रोजी घेण्याचे परीक्षा परिषद पुणे यांचेकडून नियोजन करण्यात आले असून मागील वर्षी जे विद्यार्थी इयत्ता ५ वी आणि ८ वीत होते व जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेस प्रविष्ट झालेले आहेत ते विद्यार्थी ही […]

ब्रेकिंग न्यूज :दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल कधी जाहीर होईल याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे. मात्र दहावीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून दहावीचा निकाल उद्या ( दि. १६ ) जाहीर केला जाणार आहे. उद्या दुपारी १ वाजता निकाल पुढील संकेत स्थळावर ऑनलाईन पाहता येईल. www.mahasscboard.in http://result.mh-ssc.ac.in

error: Content is protected !!