शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार मोरे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

विजय पगारे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

सेवानिवृत्तीनंतर सामाजिक उत्तरदायित्व जोपासून समाजहितासाठी प्राधान्य देऊन सार्वजनिक कार्यात योगदान द्यावे, समाजाच्या विकासाला कसा हातभार लावता येईल याला कायम प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला बीटाचे शिक्षण विस्ताराधिकारी नंदकुमार मोरे यांच्या सेवापूर्ती निमित्त झालेल्या गौरव सभारंभात मार्गदर्शन करतांना प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष निवृत्ती नाठे हे होते.

यावेळी ठाणे येथील शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे, शिक्षण निरीक्षक किरण कुंवर, इगतपुरीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे, शिक्षण विस्ताराधिकारी राजेंद्र नेरे, कैलास सांगळे, केंद्रप्रमुख शिवाजी शेवाळे, संजय सातपुते, आप्पा जाधव, पंडीत धोंडगे, अकबर शेख, राजेंद्र नांदुरकर, आप्पा पवार, वैभव उपासनी, दत्तात्रय वाणी, सागर जळगावकर, खगेश जाधव, अरुण भामरे, संजय भामरे, विजय पगारे, अतुल अहिरे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी विस्ताराधिकारी मोरे यांच्या प्रदीर्घ सेवेतील विविध प्रसंग व विविधांगी कामगिरीबद्दल राजेश तायडे, उमेश बैरागी, विजय पगारे, शिक्षणाधिकारी प्रवीण आहिरे, शिक्षण निरीक्षक किरण कुंवर, निवृत्ती नाठे, पंडीत धोंडगे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मोरे यांनीही स्वानुभव व्यक्त केले.

कार्यक्रमानिमित्त गोंदे दुमाला बीटातील वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला व वाघेरे केंद्राच्या वतीने केंद्रप्रमुख शिवाजी शेवाळे, संजय सातपुते व आप्पा जाधव यांनी मोरे यांचा सपत्नीक सत्कार केला. सभापती जोशी यांनी मोरे यांनी एकाच बीटात १७ वर्षाच्या काळातील कामगिरी, तसेच शाळांचे संगणकीकरण, भौतिक सुविधा, समाज सहभाग, डिजीटीलायझेशन, कोरोना काळातील शाळा बंद पण शिक्षण सुरु, आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना शिष्यवृत्ती परिक्षा, नवोदय विद्यालय परिक्षा, जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन आदी कामात उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल गौरवोदगार काढले. तसेच पंचायत समितीच्या वतीनेही मोरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश बैरागी व अरुण भामरे यांनी केले, तर सागर जळगावकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख शिवाजी शेवाळे, मुख्याध्यापक मधुसुदन आहीरे, शैलजा जाधव, विश्वास बच्छाव, कविता टोणगे, सुजाता गांगुर्डे, उषा गुंजाळ, मीना बागुल आदींनी परिश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!