शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी संघर्ष समितीचे विविध प्रश्नांसाठी उपसंचालकांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज दि. २९ :

पुणे विभागातील पुणे, सोलापूर, अहमदनगर ,सातारा, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यातील शालार्थ, मान्यता व इतर प्रश्नासंदर्भात उपसंचालक उकिरडे यांची भेट घेऊन विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले.

विभागातील ११८० प्रकरणे उपलब्ध असून ११५६ प्रकरणे बोर्डाकडे असून १२१ प्रकरणांना त्रुटी आहेत. ३४७ प्रस्ताव अदयापही उपसंचालक कार्यालयात जमा झाले नसून त्याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे पत्र संबंधित जिल्हा शिक्षणाधिकारी यांना देण्यात यावेत अशी मागणी केली, तर उपसंचालक कार्यलयातील कर्मचारी यांचे शालार्थ प्रकरणातील भ्रष्टाचाराबाबत माहिती देऊन तात्काळ हा प्रकार न थांबल्यास विधानभवनात सदर अधिकाऱ्यांची लक्षवेधी लावू याबाबत अवगत केले.

जिल्ह्यातील शालार्थ प्रकरणे उपसंचालक कार्यालयात उपलब्ध असूनही येथे उपलब्ध नाही असे सांगणे, एकाच संस्थेतील ज्यांनी पैसे दिले त्यांची फाईल निकाली काढणे ज्याने पैसे दिले नाही त्यांची फाईल गहाळ करणे, संबंधित शिक्षक कर्मचारी फाइल बाबत विचारणा करण्यास गेल्यास संस्थाचालक यांना सांगून त्याची मुस्कटदाबी करणे असे प्रकार होत असून ते प्रशासकीय दृष्ट्या बेकायदेशीर असल्याचे शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी संघर्ष समिती राज्याध्यक्ष श्री.जयवंत भाबड यांनी सांगितले. यावेळी समवेत राहुल पाटील, जगताप, तुषार अहिरे, रुपाली कुरुमकर आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!