इगतपुरीनामा न्यूज (वाडीवऱ्हे) दि. ०९ : सन २०२०-२०२१ ची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे रद्द झाली होती, ती परीक्षा आता गुरुवार दि. १२ ऑगस्ट रोजी घेण्याचे परीक्षा परिषद पुणे यांचेकडून नियोजन करण्यात आले असून मागील वर्षी जे विद्यार्थी इयत्ता ५ वी आणि ८ वीत होते व जे विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेस प्रविष्ट झालेले आहेत ते विद्यार्थी ही परीक्षा देवू शकतील. चालू शैक्षणिक वर्षात हे विद्यार्थी इयत्ता ६ वी व ९ वीत शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांना परिक्षेचे प्रवेश पत्र देण्याचे काम त्या त्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्यावर आहे. एकही विद्यार्थी या परिक्षेपासुन वंचित राहणार नाही यांची दक्षता घेण्याचे आवाहन इगतपुरीचे गटशिक्षण अधिकारी राजेश तायड़े व शिक्षण विस्तार अधिकारी एन. डी. मोरे यांनी केले आहे.
इगतपुरी तालुक्यात इयत्ता ५ वीचे पंधरा केंद्र असून इयत्ता ८ वीचे बारा केंद्र आहेत.इयत्ता ५ वीच्या पंधरा केंद्रांवर ११३५ विद्यार्थी तर ८ वीच्या बारा केंद्रांवर ८७६ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. सदर परीक्षचे दोन पेपर असणार आहेत सकाळी ११ ते १२.३० आणि दुपारी १.३० ते ३ यावेळेत हे पेपर होणार आहेत.
या परिक्षेसाठी केंद्र संचालकांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे, यासाठी इगतपुरी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी राजेश तायड़े यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी नंदकुमार मोरे हे परिक्षेचे कामकाज पाहत आहेत. तसेच सर्व परीक्षा केंद्रांना केन्द्रप्रमुख,विषय तज्ञ,आणि गटशिक्षण अधिकारी हे भेट देणार आहेत अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी मोरे यांनी दिली.
