जेष्ठ नेते कारभारी गीते यांचे निधन : इंजि. हरिभाऊ गीते यांना पितृशोक

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील ज्येष्ठ नेते कारभारी चिमाजी गीते ( वय ७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. स्व. कारभारी गीते हे पहिले कर्म आणि धर्म शेती मानत होते. त्यानंतर ते शिक्षणासाठी आग्रही असायचे. त्यांची पहिली ओळख शेती अन् दुसरी ओळख महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक अशी होती. प्रगतशिल टोमॅटो उत्पादक शेतकरी […]

आदिवासी ठाकूर समाजाचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड : जेष्ठ नेते यशवंतराव ठमाजी आगिवले यांचे निधन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ आदिवासी म. ठाकर/ ठाकुर समाजाचे जेष्ठ नेते यशवंतराव ठमाजी आगिवले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. आपल्या समाजासाठी आपले सर्व आयुष्य खर्च करून समाजाला संघटित करणारे सर्वांचे लाडके नेतृत्व म्हणून ते ओळखले जात. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सह्याद्री आदिवासी म. ठाकुर/ ठाकर समाज उन्नती मंडळ, राज्य कार्यकारिणी सदस्य, एकनिष्ठ भाजपा नेते […]

इगतपुरीचे दिवंगत सैनिक सचिन चिकने यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शैलेश पुरोहित, इगतपुरीनामा न्यूज, दि. १ देशाच्या संरक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे इगतपुरी तालुक्यातील भूमिपुत्र सैनिक सचिन गणूजी चिकणे यांचे मंगळवारी कर्तव्यावर असतांना दुर्दैवी निधन झाले. अंतीम क्षणी ते भोपाळ येथे कर्तव्यावर होते. यावेळी त्यांची अचानक तब्बेत खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी इगतपुरी शहर आणि तालुक्यात याबाबत माहिती समजताच सगळीकडे शोककळा पसरली. […]

त्र्यंबकेश्वरच्या माहेश्वरी समाजाचे जेष्ठ नेते मांगिलाल सारडा कालवश

ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ त्र्यंबकेश्वर येथील माहेश्वरी समाजाचे जेष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष मांगिलाल रामरतन सारडा यांचे आज दुपारी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्र्यंबकेश्वरच्या जडणघडणीत व विकासात्मक कामात कै. यादवराव तुंगार, कै. गिरीश दीक्षित, कै. सुरेश पाचोरकर, कै .रामचंद्र थेटे यांच्या बरोबर सिंहाचा वाटा होता. ते त्र्यंबकेश्वर […]

इगतपुरी किसान सेनेचे तालुकाप्रमुख मदन चोरडिया यांना मातृशोक

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० इगतपुरी तालुका किसान सेना तालुकाप्रमुख मदन चोरडिया व घोटी मर्चंट बँकेचे स्वीकृत संचालक निलेश चोरडिया यांच्या मातोश्री पानकवरबाई बस्तीमल चोरडिया ( वय ९० ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. विविध क्षेत्रातील नागरिकांनी चोरडिया परिवाराला शोकसंदेश पाठवले आहेत.

बाजार समितीचे माजी सभापती गणपत राव यांना बंधुशोक

मुकणे येथील रहिवासी तथा नाशिक महावितरण कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी पंढरीनाथ पांडुरंग राव ( वय ८० ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुले, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गणपत पाटील राव यांचे ते बंधु होत.

“मॅग्मो प्रकाश” नावाचे वादळ काळाच्या पडद्याआड !

लेखन :- जी. पी. खैरनार, नाशिक महाराष्ट्र राज्यात राजपत्रित वैद्यकीय अधिकारी यांना गट – ब मधून गट – “अ” श्रेणीत श्रेणीवर्धन करुन गट – अ श्रेणीचे वेतन मिळवून देणारे शिल्पकार तथा वैद्यकीय क्षेत्रातील महान तपस्वी डॉ. प्रकाश आहेर यांचे आज दुर्धर आजारपणामुळे दुःखद निधन झाले ही खूपच वेदनादायी व दुःख देणारी घटना आहे. नाशिक जिल्ह्यातील […]

ढाण्या वाघ घडवणारे भिकाजी पांगाजी जाधव यांचे चंद्रमौळी जीवन

लेखन : नीरज चव्हाणमहाराष्ट्र प्रदेश महानिरीक्षकअखिल भारतीय आदिवासी विकास परिषद कमी शिक्षण झालं असलं तरी उच्चतम ध्येयाने प्रेरित होऊन आपले अख्खे जीवन अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी खर्च करणारे व्यक्ती जणू देवता आहेत. समाजाची दशा आणि दिशा पाहून पुढील १०० वर्षाचे नियोजन करून त्याप्रमाणे कृतीबद्ध कार्यक्रम प्रत्यक्षात आणतांना अशा व्यक्ती समाजाला मोठी दिशा देतात. आदिवासी समाजासाठी […]

स्वर्गीय आरके

स्वर्गीय राजाराम खैरनार उर्फ आरके, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ यांच्या श्रद्धांजली सभेसाठी सादर केलेल्या काव्यपंक्ती ! रचना :- जी. पी. खैरनार, नाशिक९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१ आरके नावाची गुढी उभारुणी,शिक्षकांसाठी जन्मास आला !शांत, नितळ, सुस्वभावी देवा,का तू अकाली निघून गेला !! काय वर्णावी आपली महती,प्रेम दिले आपण शिक्षकांना !काय चुकले बंधुराजे आमचे,का प्रायचीत्य दिले घरच्यांना !! साऱ्या […]

अद्वितीय व्यक्तिमत्व सोमनाथ तेलोरे ह्या अष्टपैलू शिक्षकाची अखेर

– अनिल बागुल, जिल्हा सल्लागारमहाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, नाशिकपदवीधर शिक्षक, मुंढेगांव, ता. इगतपुरी 30 एप्रिल 2021. रात्री अकराची वेळ. डिस्चार्ज मोबाईल चार्जिगला लावून बाहेर गेलो होतो. घरी आलो तर पत्नी म्हणाली तुमचा फोन लागत नाही. बरेच फोन आले. सपकाळे सर, बोढारे अण्णा, द. ल. वाणी, नरेंद्र सोनवणे यांनी शेवटी माझ्या फोनवर संपर्क केला. मित्रांनी […]

error: Content is protected !!