त्र्यंबकेश्वरच्या माहेश्वरी समाजाचे जेष्ठ नेते मांगिलाल सारडा कालवश

ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

त्र्यंबकेश्वर येथील माहेश्वरी समाजाचे जेष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष मांगिलाल रामरतन सारडा यांचे आज दुपारी त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्र्यंबकेश्वरच्या जडणघडणीत व विकासात्मक कामात कै. यादवराव तुंगार, कै. गिरीश दीक्षित, कै. सुरेश पाचोरकर, कै .रामचंद्र थेटे यांच्या बरोबर सिंहाचा वाटा होता. ते त्र्यंबकेश्वर माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष होतेच पण दोन वेळा नगरसेवक आणि 1991 ते 1993 या काळात नगराध्यक्ष होते.

त्यांनी  1991/1992 सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन त्या काळात अन्य सहकाऱ्यांच्या सहकार्याने पार पाडले. त्यांनी 25 वर्षापुर्वी 11 ऑगस्ट 1994 ला कै. देवेंद्र सारडा नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. आज ही पतसंस्था त्र्यंबकेश्वर मधील अग्रगण्य पतसंस्था आहे. सन 2021 हे वर्ष संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. लाॅकडाउन संपल्यानंतर ते व त्यांचे सहकारी संस्थेचा रौप्य महोत्सव साजरा करणार होते. दुर्दैवाने त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 5 मुली, 3 भाऊ, बहिणी, सुन, नातु असा मोठा परिवार  आहे.