मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत उद्या इगतपुरीत बैठक : सर्व राजकीय पक्षांनी हजर राहण्याचे तहसीलदारांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – भारत निवणूक आयोगाच्या १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या सुधारीत कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२३ ह्या दिवशी प्रसिध्द होणार आहे. त्याअन्वये प्रारुप मतदार यादीसाठी ९ डिसेंबर पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहे. यासाठी उद्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता, इगतपुरी तहसिल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ह्या बैठकीसाठी इगतपुरी तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष आणि संघटना यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्य्क मतदार नोंदणी अधिकारी तथा इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर, निवडणूक नायब तहसीलदार वर्षा वाघ यांनी केले आहे.

error: Content is protected !!