“माजी झेडपी सदस्य” म्हणून आजपासून नवे प्रशासकीय पर्व सुरू : पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हा नियोजन समितीचे महत्व वाढणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० अखेर आजपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ह्या प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत. जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, खासदार आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांच्याशी सल्लामसलत करून प्रशासकीय कारभार हाकला जाणार आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आता “माजी” झाले आहेत. निवडणुका होऊन निवडून आलेल्या सदस्यांची पहिली […]

निवडणुका होईपर्यंत जिल्हा परिषदेवर सीईओ लीना बनसोड आणि पंचायत समितीवर बीडीओ लता गायकवाड असणार प्रशासक : २१ मार्चला जिल्हा परिषद आणि १४ मार्चला पंचायत समितीवर लागणार प्रशासकीय राजवट

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ गेली ५ वर्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या विविध पदांवर काम करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींची मुदत काही दिवसातच संपत आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींचे राज्य संपुष्टात येऊन अधिकाऱ्यांचे राज्य येणार आहे. लोकप्रतिनिधींच्या राजकारणामुळे रखडलेली विकासकामे प्रशासकीय राजवटीमध्ये निश्चित मार्गी लागतील असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे. विविध कारणांमुळे निवडणुका लांबल्या असल्याने प्रशासकीय राजवट […]

ग्रामीण राजकारणातील अनेक दिग्गज पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल : प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण राजकारणातील अनेक दिग्गज पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती घेतले. महत्वपूर्ण असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या समर्थकांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या ताकदीमध्ये मोठी भर पडली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील प्रवेश सोहळा हा विजयाची नांदी मानला जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील, […]

२० मार्चपासून विद्यमान सदस्य होणार ❝माजी झेडपी सदस्य❞ : प्रशासकीय राजवटीमुळे ७२ सदस्यांना व्हावे लागणार सामान्य नागरिक

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ येत्या २० मार्चला नाशिक जिल्हा परिषदेची पाच वर्षाची मुदत संपुष्टात येणार आहे. परिणामी २० मार्चपासून ७२ जिल्हा परिषद सदस्य असणारे लोकप्रतिनिधी “माजी जिल्हा परिषद सदस्य” म्हणून ओळखले जाणार आहे. अनेक कारणांमुळे निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. त्यामुळे विद्यमान सदस्यांना मुदतवाढ मिळेल अशी कारणे सांगून जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी ठेकेदारांकडून निवडणूक निधी लाटत असल्याची […]

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, याबाबत विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक मांडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.विधान परिषदेत  ओबीसी आरक्षण प्रश्नावर  नियम २८९ अन्वये चर्चेला उत्तर देताना  उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. सभागृहातील सर्वच सदस्य […]

आगामी निवडणुका होणार ओबीसी आरक्षणाविना : पुढील आदेशापर्यंत ओबीसी आरक्षणाला स्थगिती

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ आगामी जिल्हा परिषद पंचायत समित्या, महानगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी दूरगामी परिणाम करणारी बातमी आहे. आरक्षण देण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेला अहवाल फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत ओबीसींना आरक्षण मिळणार नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. ह्या अहवालातील आकडेवारीनुसार ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व दिसत नसल्याचे कारण देण्यात आले […]

निवडणुकांची रणधुमाळी – जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि मनपाच्या निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात ??

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३ राज्यातील २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि १४ मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल अथवा मे महिन्यात होण्याचे संकेत मिळाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुका घेण्याबाबत पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त यु. पी. एस. मदान यांनी निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत सर्वच राजकीय पक्षांशी बैठकीद्वारे संवाद साधला. एप्रिल, मे महिन्यात विविध टप्प्यांमध्ये […]

ओबीसी आरक्षणाने निवडणुका होणार की आरक्षणाशिवाय होणार निवडणुका ? : सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणार महत्वपूर्ण सुनावणी

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ विविध सर्व्हेक्षण, तपशील आणि ओबीसीची लोकसंख्या लक्षात घेता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी ओबीसीला आरक्षण देता येणे शक्य आहे असा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची मुदत काही दिवसातच संपणार असल्याने राजकीय पक्षांना […]

जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्तीसाठी पुढील आठवड्यात निर्णय ? : मुंबई मनपावर प्रशासक नेमण्याचा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला निर्णय

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ नाशिक जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे वाढली आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती कायद्यात विद्यमान सदस्यांना मुदतवाढ देण्याची तरतूद नसल्याने प्रशासकाची नियुक्ती होणे जवळपास निश्चित झाले असल्याचे समजते. बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. […]

ओबीसी आरक्षणशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही : राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ ओबीसी आरक्षण नसेल तर स्थानिक स्वराज्य निवडणुका घेतल्या जाऊ नये यासाठीच्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सही केली आहे. यामुळे विधेयकाचे रूपांतर कायद्यात झाले आहे. परिणामी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. राज्यातील काही मनपा निवडणुका तोंडावर आल्याने थोड्याबहुत प्रमाणात प्रक्रिया सुरू करण्यात आली […]

error: Content is protected !!