निवडणुकीतील मारहाण प्रकरणी युवासेना उपजिल्हाप्रमुख मिथुन राऊत यांच्यासह ६ जण निर्दोष

इगतपुरीनामा न्युज – २००८ मध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गट युवासेना उपजिल्हाप्रमुख मिथुन राऊत यांच्यावर आणि त्यांचे सहकारी पेठ पंचायत समितीचे माजी सभापती अंबादास चौरे, आमलोण ग्रामपंचायत माजी सरपंच प्रकाश बोरसे, घनशेतचे माजी सरपंच कैलास चौधरी, हरसुलचे माजी सरपंच अशोक लांघे, मुरंबीचे माजी सरपंच अर्जुन मौळे, गावठाचे माजी सरपंच हिरामण […]

महिला सक्षमीकरण होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा आवश्यक – प्रा. छाया लोखंडे : पेठ महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा

 इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादासाहेब बिडकर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत निर्भय कन्या अभियान कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत प्रा. छाया लोखंडे यांनी महिलांना सक्षम बनायचे असेल तर शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येक महिलांनी स्वावलंबी झाले पाहिजे. त्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. भविष्यात तुम्ही सक्षम आणि […]

डेल्टा फिनोकेमच्या मदतीने हरणगाव येथे नवव्या एसएनएफ वाचनालयाचा ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते शुभारंभ

इगतपुरीनामा न्यूज ता. २४ : “गाव तेथे वाचनालय” या वाचन चळवळीअंतर्गत सोशल नेटवर्कींग फोरमच्या हरणगाव येथील नवव्या अभ्यासिकेचा शुभारंभ जेष्ठ साहित्यिक, संपादक उत्तम कांबळे आणि रोटरीचे माजी प्रांतपाल दादासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते झाला. ज्या युगात लोक सरकार किंवा सामाजिक संस्थाकांडून भौतिक सुखांची मागणी करतात त्याच युगात आदिवासी गावं सोशल नेटवर्किंग फोरमकडे वाचनालय मागत आहेत ही […]

सोशल नेटवर्किंग फोरमच्या ग्रामीण वाचनालयासाठी साडेतीन लाख रुपयांची मदत

इगतपुरीनामा न्यूज दि. २३ : सोशल नेटवर्किंग फोरम ही सामाजिक संस्था आदिवासी भागातील विविध मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी गेली दहा वर्षे सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. फोरमचे हे सातत्याने सुरू असलेले मदतकार्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान यामुळे प्रेरीत होवून डेल्टा फिनोकेम प्रा. लि. चे संस्थापक आणि रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल दादा देशमुख यांनी फोरमला तीन […]

प्रमोद अहिरे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद बोरवठ शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रमोद अहिरे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेचा ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. पुरस्कार सोहळा आज शिक्षक दिनाच्या दिवशी ऑनलाइन संपन्न झाला. शिक्षक सन्मान पुरस्कार वितरण महासोहळा २०२१ या ऑनलाईन उपक्रमात हा ‘पुरस्कार नामांकन’ प्रस्ताव सादर करण्यात आला […]

आदिवासी भागातील 12 गावांमध्ये शालेय मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धां संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १० जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 12 गावांमध्ये शालेय मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जागतिक आदिवासी दिन साजरा करतांना ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ मिळावे, शालेय शिक्षणापासून त्यांच्यातल्या वक्तृत्व कलेला चालना मिळावी, आत्मविश्वास वाढावा यासाठी सोशल नेटवर्किंग फोरम च्या माध्यमातून बारा गावांना वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. पेठ, त्र्यंबक व […]

गांगोडबारी येथे आदिवासी दिनानिमित्त धानपूजा आणि आदिवासी नृत्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गांगोडबारी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी धानपूजा व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नागली, वरई, तांदूळ, कुळीद, तूर  या पाच धान्यांची तसेच पारंपारिक वाद्य, उपजीविकेचे साधन यांची पूजा करण्यात आली. मुलांनी ढोल व तारपा या वाद्यावर पारंपारिक आदिवासी नृत्य  सादर […]

आदिवासी दिनानिमित्त बोरवठ येथे वृक्षारोपण : सोशल नेटवर्किंग फोरमचा अनोखा उपक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ पेठ तालुक्यातील बोरवठ येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बोरवठ गावचे स्वातंत्र्यसेनानी अमृता पाटील, क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या चित्राचे टी-शर्ट असलेले अनेक तरुण कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला. रितेश खरे, दिशा फाउंडेशनचे  समन्वयक किरण काळे, एमआरईजीएस चे सहाय्यक कार्यकारी अधिकारी […]

error: Content is protected !!