गांगोडबारी येथे आदिवासी दिनानिमित्त धानपूजा आणि आदिवासी नृत्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९

पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गांगोडबारी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी धानपूजा व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नागली, वरई, तांदूळ, कुळीद, तूर  या पाच धान्यांची तसेच पारंपारिक वाद्य, उपजीविकेचे साधन यांची पूजा करण्यात आली. मुलांनी ढोल व तारपा या वाद्यावर पारंपारिक आदिवासी नृत्य  सादर केले.

राहुल साबळे यांनी ‘आदिवासी समाजा समोरील आव्हाने’ याविषयावर मांडणी केली.  दहावी, बारावी परिक्षेतील यशाबद्दल विद्यार्थ्यांना, आदिवासी लोककला जोपासणाऱ्या कलावंतांना  सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी सरपंच मंजुळा जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रभाकर दळवी, कुंदन जाधव, ताराबाई महाले, गजेंद्र माळगावे, माधव वाघेरे, योगेश कामडी, प्रभाकर गवळी, ललित बोरसे, हिरामण मौळे, बाळू चव्हाण, यादव पेटार, कमलाकर भोये तसेच तरुण मित्र मंडळ तथा गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण माळगावे यांनी केले.