इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
पेठ तालुक्यातील बोरवठ येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बोरवठ गावचे स्वातंत्र्यसेनानी अमृता पाटील, क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या चित्राचे टी-शर्ट असलेले अनेक तरुण कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला. रितेश खरे, दिशा फाउंडेशनचे समन्वयक किरण काळे, एमआरईजीएस चे सहाय्यक कार्यकारी अधिकारी ओमकार जाधव यांनी ‘आदिवासी संस्कृती व आव्हाने’ यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सोशल नेटवर्किंग फोरम तर्फे आदिवासी दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा व मंगल कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले.
पद्माकर कामडी, मधुकर पाटील, महादू महाले, येवाजी पवार, नाना गवळी, नामदेव आवारी, उत्तम पाटील, प्रभाकर राऊत, शाम भवर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. आदिवासी समाज निसर्गपूजक असल्याचा संदेश वृक्षारोपणातून देण्यात आला. मधुमालती, सिल्वर ओक, पाम ट्री, मोरपंखी, इंडियन ख्रिसमस ट्री, लंडन जुलिफर, बिटी इत्यादी रोपे यावेळी लावण्यात आली. सोशल नेटवर्किंग फोरमचे ग्राम समन्वयक रोहिदास राऊत, मुख्याध्यापक पद्माकर भोये, भारती कुदळ, भास्कर गावीत यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद अहिरे यांनी केले.