इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद बोरवठ शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रमोद अहिरे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेचा ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुणगौरव शिक्षक रत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. पुरस्कार सोहळा आज शिक्षक दिनाच्या दिवशी ऑनलाइन संपन्न झाला. शिक्षक सन्मान पुरस्कार वितरण महासोहळा २०२१ या ऑनलाईन उपक्रमात हा ‘पुरस्कार नामांकन’ प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पुरस्कार निवड समितीच्या छाननी प्रक्रियेत हा प्रस्ताव पुरस्कारासाठी स्वीकृत झाला. ऑनलाइन सोहळ्यानंतर पुरस्कार साहित्य सन्मानचिन्ह, सन्मानपदक, मानपत्र, महावस्त्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा पोस्टल पार्सल सेवेने पाठविण्यात येईल, अशी माहिती गुणिजन गुरुगौरव शिक्षक सन्मान सोहळा संयोजन समितीचे एल. एस. दाते यांनी दिली. प्रमोद अहिरे यांना जिल्हा परिषद नाशिकचा गुणवंत शिक्षक पुरस्कारही जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांचे शिक्षक वर्गाकडून अभिनंदन होत आहे.