इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून पेठ, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 12 गावांमध्ये शालेय मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. जागतिक आदिवासी दिन साजरा करतांना ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ मिळावे, शालेय शिक्षणापासून त्यांच्यातल्या वक्तृत्व कलेला चालना मिळावी, आत्मविश्वास वाढावा यासाठी सोशल नेटवर्किंग फोरम च्या माध्यमातून बारा गावांना वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.
पेठ, त्र्यंबक व दिंडोरी तालुक्यातील पेठ, उस्थळे,कोटंबी, हातरूंडी, गारमाळ, भूवन, जूनोठी, शेवखंडी, तोरंगण, चिरापरली, अंबोली, कोकणगाव आदी गावात या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, ट्रॉफी, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, तालुका समन्वयक रामदास शिंदे, संदिप बत्तासे, जयदिप गायकवाड यांचे सह ग्रामसमन्वयक यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीसासाठी योगदान
डाॅ. अलका मांडके, सुनिल पाटील, दिपक खैरनार, निलेश सोनवणे, लायन्स क्लब नाशिक काॅर्पोरेट, आदिती बक्षी, रोहन बक्षी, संजय निकम, वैशाली कुलकर्णी, प्रसाद देशमुख, दादा देशमुख, डाॅ. विशाल पवार, प्रा. सुमती पवार, प्रविण भालेराव
तीन गावांना वृक्षारोपण !
सोशल नेटवर्कींग फोरमच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील बोरवठ,घोटपाडा व बोरधापाडा येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षण व वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. यासाठी सोशल नेटवर्कींग फोरमने विविध प्रकारची झाडे उपलब्ध करून दिली.