महिला सक्षमीकरण होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुद्धा आवश्यक – प्रा. छाया लोखंडे : पेठ महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा

 इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादासाहेब बिडकर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ अंतर्गत निर्भय कन्या अभियान कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत प्रा. छाया लोखंडे यांनी महिलांना सक्षम बनायचे असेल तर शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येक महिलांनी स्वावलंबी झाले पाहिजे. त्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. भविष्यात तुम्ही सक्षम आणि निर्भय बना, कोणतीही भीती मनात बाळगू नका असे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.

कार्यशाळेचे दुसरे पुष्प डॉ. योगिता पगार यांनी महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी  स्वतःची व आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आहार सकस पोषक असावा या संदर्भात आपले मत व्यक्त केले. तर ॲड. प्रतिभा शिरसाठ यांनी महिलांचे हक्क आणि अधिकार या विषयावर मार्गदर्शन करताना जर महिलावर अन्याय झाला असेल तर कोणत्या कलमाखाली तक्रार नोंदविता येते, एकूण किती कायदे आहेत या संदर्भातली जाणीव त्यांनी महिलांना करून दिली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. बी. टोचे होते त्यांनी विद्यार्थ्यांना सक्षम बनण्यासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतः प्रयत्नशील  असावे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. छाया सैंदाणे यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचा घेण्याचा हेतू व उद्दिष्ट सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना राऊत, परिचय जयश्री निरगुडे तर आभार प्रियंका वैजल यांनी मानले  कार्यशाळेत ८० विद्यार्थिनी सहभागी झालेल्या होत्या.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रदीप देशपांडे, डॉ. गणेश रुपवते, प्रा. मोरे, प्रा. भुसारे यांनी परिश्रम घेतले.
 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!