ध्येयवेडे होऊन प्रयत्न केल्यास यशाचा मार्ग हमखास सापडणार – पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर : नाशिप्रच्या इगतपुरी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अविरत प्रयत्न, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा, त्यांचा अभ्यासक्रम, मुलाखत व निवडपद्धती याविषयी सविस्तर माहिती गरजेची आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे याला ग्रामीण तरुणांचा प्रामाणिकपणा व […]

श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे एप्रिल २०२४ पासून उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वस्त्रोद्योग मंत्री करणार विशेष मदत

इगतपुरीनामा न्यूज : श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती महिला सहकारी सूतगिरणी इगतपुरीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सामाजिक न्याय विभागाकडून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे यंत्रसामग्री १ ऑक्टोंबरपासून येण्यास सुरवात होणार आहे. उर्वरित लागणाऱ्या लिंक कोनर मशीन वस्त्रोद्योग विभागाच्या उर्वरित भागभांडवलामधून व सामाजिक न्याय विभागाच्या उर्वरित कर्जामधून यंत्रसामुग्री खरेदी केली जाईल. पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेपुर्वी ही सूतगिरणी उत्पादनाखाली […]

राजमुद्रा मंडळातर्फे गोंदे दुमाला येथे उद्या विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान सोहळा : स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. डॉ देविदास गिरी यांचे मिळणार मार्गदर्शन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील राजमुद्रा सामाजिक शैक्षणिक मंडळातर्फे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, होतकरू विद्यार्थ्यांसह सर्वांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हरी होम साई ढाबा संचालक अकबरशेठ पठाण यांच्या सौजन्याने व तरुणांचे आदर्श माजी अध्यक्ष संदीप नाठे व राजमुद्रातर्फे उद्या शनिवारी २६ ऑगस्टला हा कार्यक्रम […]

पवित्र पोर्टलला अद्याप मुहूर्त नाही.. शिक्षक भरतीचे भिजत घोंगडे !

इगतपुरीनामा न्यूज : राज्यात दोन टप्प्यात शिक्षक भरती केली जाणार असून पहिल्या टप्प्यात जवळपास तीस हजार जागा भरण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान स्पष्ट केले होते. त्यासाठीचे वेळापत्रकही त्यांनी जाहीर करून 15 ऑगस्ट पासून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र 15 ऑगस्ट नंतर आज सहा […]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नोकरी महोत्सवाद्वारे इच्छुक उमेदवारांना मिळणार नोकरीची सुवर्णसंधी : नाशिकच्या राष्ट्रवादी भवनात उद्या सकाळपासून भव्य “नोकरी महोत्सव”

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उद्या सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नाशिक येथील राष्ट्रवादी भवनात नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील अनेक उद्योजक, कारखानदार आणि संस्था उपस्थित […]

तुकाराम वारघडे यांच्या प्रयत्नांनी शेकडो निराधार महिलांना मिळाला रोजगार : माता भगिनी आणि युवकांच्या रोजगारासाठी प्रयत्न करणार – तुकाराम वारघडे

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – अनेक संकटे झेलत संसाराला हातभार लावणाऱ्या अनेक महिलांना रोजगार मिळण्यासाठी नेहमीच अडथळ्यांची शर्यत करावी लागते. याप्रकारे रोजगाराच्या शोधात असलेल्या इगतपुरी तालुक्यातील शेकडो निराधार महिलांसह गरीब परिस्थिती हलाखीचे जीवन जगणाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे यांनी रोजगार मिळवून दिला आहे. याबद्धल महिलांकडून तुकाराम वारघडे यांचे आभार मानले जात आहेत. गरजू महिलांना […]

काळुस्ते येथे शिकलेली ‘पूनम’ झाली उपजिल्हाधिकारी : जिल्हाधिकारी होण्यासाठी आईवडिलांच्या आशीर्वादाने तयारी सुरु

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ – इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणात सुरुवात करून अभिनव शाळा घोटी, जनता विद्यालय घोटी या आदिवासी भागातील शाळांत शिक्षण घेऊन पूनम अहिरे उपजिल्हाधिकारी झाली आहे. तिचे हे स्वप्न स्वप्न साकार झाल्याने आदिवासी भागात आनंद व्यक्त होतोय. भंडारदरावाडी, काळुस्ते, घोटी या गावात आईवडीलांच्या नोकरी निमित्ताने बालपणात पूनमच्या शाळा बदलत गेल्या. […]

फार्मसीतील पदव्युत्तर प्रवेशासाठी GPAT च्या यशाची गुरुकिल्ली

लेखक – प्रा. कमलेश रमेश दंडगव्हाळ, सहाय्यक प्राध्यापकगो. ए. सोसायटीचे सर डॉ. एम. एस. गोसावी औषध निर्माण महाविद्यालय नाशिक GPAT किंवा ग्रॅज्युएट फार्मसी टेस्ट ही एक प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. जीएनटीए ( नॅशनल टेस्टिंग एजन्सी ) द्वारे मास्टर्स इन फार्मसी ( एम. फार्म ) किंवा भारतातील इतर कोणत्याही समकक्ष प्रोग्राम प्रवेशांसाठी दरवर्षी घेतली जाते. […]

स्पर्धा परीक्षाद्वारे सुलभ यश मिळवण्यासाठी आपल्या क्षमतांचा विकास करून निर्विवाद यशाचे मानकरी व्हा – डॉ. प्रताप दिघावकर : ग्रामविकासाच्या नव्या पॅटर्नमुळे मोडाळेचे ओळख महाराष्ट्राला झाल्याचे केले कौतुक

इगतपुरीनामा न्यूज, दि. 12 मोठी स्वप्न आणि त्या स्वप्नासाठी अविरत कष्ट घेण्याची तयारी असल्यास कोणतेही मोठे उद्धीष्ठ पूर्ण व्हायला अजिबात वेळ लागणार नाही. ग्रामीण भागातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोडाळे येथील अभ्यासिकेमुळे देशाच्या आणि राज्याच्या सेवेतील उच्च अधिकारी होण्याची संधी आहे. यासाठी गोरख बोडके आणि आम्ही अधिकारी आपल्या सर्वांच्या पाठीशी आहोत. स्पर्धा परीक्षाद्वारे सुलभ यश मिळवण्यासाठी […]

युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार मोडाळे येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेचे लोकार्पण : आदर्श गाव मोडाळे येथे ३० जुलैला लोकार्पण सोहळ्याचे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ इगतपुरी तालुक्यातील आदर्श गाव मोडाळे येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज तथा स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते होणार आहे. शुक्रवारी २९ जुलैला मोडाळे येथे सकाळी ११ वाजता हा भव्य लोकार्पण सोहळा होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, […]

error: Content is protected !!