
इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे उद्या सोमवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नाशिक येथील राष्ट्रवादी भवनात नोकरी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील अनेक उद्योजक, कारखानदार आणि संस्था उपस्थित राहून पात्र उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत. महोत्सवात सहभागी होण्यासाठी ncpyouthnashik.jobfairindia.in या लिंकवर नावनोंदणी करावयाची आहे. महोत्सवात जिल्ह्यालगतच्या विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रासह महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.