दीड वर्षांपासून त्रस्त शेतकरी कुटुंबांची भावनिक साद इगतपुरीनामा न्यूज – माननीय आमदार हिरामण खोसकर साहेब, अस्वली स्टेशन जानोरी रस्त्यावरील ओंड ओहोळ पुलाचे काम गेल्या दीड वर्षापासून रखडलेले आहे. यामुळे या भागातील विद्यार्थ्यांसह शेतकरी आणि वाहनधारकांचे जाण्या येण्याचे प्रचंड हाल सुरु आहेत. जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत कुटुंबासह पुलाखाली आम्ही मुक्काम करून बिऱ्हाड आंदोलन करणार आहोत. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात महिलेवर झालेला अत्याचार व खूनाच्या घटनेच्या निषेधार्थ घोटी शहरात मोर्चा काढण्यात आला. मोर्चाद्वारे पीडित महिलेला श्रद्धांजली वाहण्यात आली. घोटी शहरात उत्स्फूर्तपणे काढण्यात आलेल्या मोर्चात महिलांसह तालुक्यातील विविध पदाधिकारी आणि नागरिक सहभागी झाले होते. संबंधित पीडित महिला अतिशय गरीब कुटुंबातील होती. तिच्या अखंड कुटुंबाचा उदरनिर्वाह तिच्यावर अवलंबून होता. अशा गरीब महिलेवर […]
इगतपुरीनामा न्यूज – पाडळी देशमुख येथील गट नंबर ४२२ मधील काही क्षेत्र महामार्गासाठी संपादित आहे. या क्षेत्रातील बांधलेले व्यापारी गाळे पाडण्याचे आश्वासन महामार्ग प्रशासनाने दिले होते. त्यावर एक वर्षानंतरही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पाडळी देशमुखचे धांडे कुटुंबिय १ मे महाराष्ट्र दिनी इगतपुरीच्या तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी शहरातील नागरिकांना मुलभुत सुविधा मिळाव्या या मागणीसाठी इगतपुरी येथील जागृत नागरिक समितीचे जेष्ठ नागरिक पुरणचंद लुणावत, किरण फलटणकर, अजित पारख, विशाल चांदवडकर, विलास कदम यांनी इगतपुरी नगरपरिषदेच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज ह्या उपोषण आंदोलनाचा दुसरा दिवस असून या उपोषणाला सर्वपक्षीयांसह शहरातील सर्व नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे. इगतपुरी शहर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – पुढील काही महिने पाणी पुरणार नाही. भीषण पाणी टंचाई येईल असे कारण सांगत इगतपुरी तालुक्यातील चिंचलेखैरे ग्रामपंचायतीपैकी खैरेवाडी येथील विहीरीवरील सौरऊर्जा प्रकल्प बंद करण्यात आला आहे. वीज पुरवठा मिळत नसल्याने ही नळपाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर सुरू करण्यात आलेली होती. मात्र नळपाणी पुरवठा सुरू राहीला तर पाणी टंचाई निर्माण होईल […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. १ – इगतपुरी तालुक्यातील देवळे उघडेवाडी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दाही दिशा भटकावे लागत आहे. म्हणून ह्या पेयजल योजनेचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा इगतपुरीच्या पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सरपंच ज्ञानेश्वर उघडे, उपसरपंच ज्ञानेश्वर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुका हा आदिवासी तालुका गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा तालुका आहे. भात शेती, पावसाचे माहेरघर आणि निसर्गरम्य वातावरणामुळे पर्यटक इगतपुरी तालुक्याला भेट देतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून सक्तीचे हिंदू धर्मांतर होत असल्यामुळे ह्या तालुक्यात चिंता आहे. अन्य धर्मीय लोक हिंदू गावांमध्ये जाऊन त्यांच्या धर्माचा प्रसार करुन लोकांना पैसे आणि […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – इगतपुरी तालुक्यातील शेकडो स्थानिक बेरोजगारांना कंपन्याचे उंबरठे झिजवावे लागत आहे. महामार्ग, रेल्वे, लष्कर, धरणे, समृद्धी आणि अनेक शासकीय प्रकल्पासाठी तालुक्याच्या जमिनी संपादन केलेल्या आहेत. मात्र बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून दिला जात नसल्याने ते हतबल झाले आहेत. ह्या सर्व स्थानिक तरुणांना विविध कंपन्यांमध्ये काम मिळावे यासाठी स्वराज्य संघटना […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २७ – इगतपुरी तालुक्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशान्वये इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, मविप्रचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाख़ाली इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]
इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – २००५ पासून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु केलेली नाही. त्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू असून त्यांना फक्त अडीच हजार रूपये पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. जो पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तो पर्यंत संप आणि संघर्ष असाच सुरूच राहणार आहे असे प्रतिपादन सीटुचे […]