
इगतपुरीनामा न्यूज – अस्वली स्टेशन येथील ग्रामस्थांचा महत्वाचा दिवाळी सण वीज मंडळाच्या कारभारामुळे भर अंधारात गेला. अद्यापही येथील ग्रामस्थांना वीज मंडळाच्या बेजबाबदार कारभाराचा फटका बसणे सुरूच आहे. सातत्याने विजेचा लपंडाव होत असल्यामुळे ग्रामस्थ कंटाळले असून संतप्त भूमिकेत आले आहेत. वीज कर्मचारी आणि अधिकारी ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे संतापलेले अस्वली स्टेशनच्या ग्रामस्थांनी वाडीवऱ्हे वीज मंडळ कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. सर्वाना भर दिवाळी अंधारात घालावी लागली याबाबत वीज मंडळाचे अधिकारी श्री. आगरकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अस्वली स्टेशनचा विजेचा प्रश्न आणि खेळखंडोबा तातडीने सोडवावा. अन्यथा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून अस्वली स्टेशन येथील वीज प्रश्न सोडवावा, वाडीवऱ्हे वीज मंडळ अधिकाऱ्यांना या समस्या बाबत जाब विचारावा अशी अपेक्षा आहे. हा गंभीर प्रश्न न सुटल्यास वाडीवऱ्हे विद्युत मंडळाच्या कार्यालयासमोर मुंबई आग्रा महामार्गांवर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.